IND vs AUS Test बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर

IND vs AUS Test बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर

Border Gavaskar Trophy News :

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियात दरवर्षी खेळवल्या जाणाऱ्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही मालिका 22 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. हा दौरा दोन महिने चालणार आहे.

बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिकेत हिंदुस्थान व ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच कसोटी सामने खेळणार आहेत. या मालिकेची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून होणार असून पहिला कसोटी सामना पर्थ येथे होणार आहे. गेल्या वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’ने ऑस्ट्रेलियाविरुद्धची बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका सलग चौथ्यांदा जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्यामुळे यंदाची मालिका जिंकून टीम इंडिया विजयाची पंचमी साजरी करेल का हे बघावं लागेल.

पहिला कसोटी सामना – 22 ते 26 नोव्हेंबर, पर्थ
दुसरा कसोटी सामना – 6 ते 10 डिसेंबर, अॅडलेड ओव्हल
तिसरा कसोटी सामना – 14 ते 18 डिसेंबर, गाबा, ब्रिस्बेन
चौथा कसोटी सामना – 26 ते 30 डिसेंबर, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड
पाचवा कसोटी सामना – 3 ते 7 जानेवारी, सिडनी क्रिकेट ग्राउंड

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;