जालन्यातील वैतागवाडीच्या खदानीत बुडून दोन मुलींचा मृत्यू

जालन्यातील वैतागवाडीच्या खदानीत बुडून दोन मुलींचा मृत्यू

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोंदी जवळील वैतागवाडी येथील खदानात दुपारच्या वेळी दोन मैत्रीणी कपडे धुण्यास गेल्या असता त्या दोघींचाही या खदाणीत बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवार 25 मार्च रोजी दुपारी 11 वाजता घडली. यातील कमल सुभाष भालेराव ही मुळची हालदोला ता. बदनापूर, जि. जालना येथील तर असरीन हुसेन शेख ही मुळची गेवराई जि.बीड येथील आहे.

अंबड तालुक्यातील गोदीजवळील वैतागवाडी जवळील खदानीत भरपूर पाणी असल्याने दूपारच्या वेळेस कमल सुभाष भालेराव (14) असरीन हुसेन शेख (14) या दोन्ही रा.गोंदी ईदगाह जवळ या दोघी शेजारीच राहत असल्याने मैत्रिणी कपडे धुण्यासाठी घरातून एकत्र निघाल्या. शहागड-गोंदी रस्ता सर करुन घराजवळच एक कि.मी.असलेल्या डांबर तोडून मानव निर्मित करण्यात आलेल्या खदानीत कपडे धुण्यासाठी सोमवारी 25 मार्च रविवारी दुपारी गेल्या होत्या. कपडे धुण्यासाठी खदानीत दगडावर बसतांना एकीचा तोल जाऊन ती पाण्यात पडल्याने दुसरीने तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघींनाही पाण्यात पोहता येत नसल्याने दोघींना पाण्याबाहेर येता आले नाही. खदानीच्या वर असलेल्या एका लहान मुलाने ही घटना पाहिली आणि त्याने जवळ असलेल्या रहिवाशी व नागरीकांना बोलवण्यासाठी धाव घेतली. पंरतु रंगपंचमी सण आणि ऊन असल्याने जवळ कोणीच नव्हते. या दोघींनाही वाचविण्यास मदत मिळू शकली नाही.

काही वेळानंतर गावकर्‍यांना व नातेवाईकांना याची माहिती मिळताच त्यांनी खदानीकडे धाव घेवून अर्ध्या तासानंतर पाण्याच्या बाहेर काढण्यात आले. सुट्टीचा दिवस असल्याने 50 मिटर अंतरावर जवळच असलेली गोंदी प्राथमिक आरोग्य केंद्रातही कोणी उपस्थित नसल्याने त्यानंतर नातेवाईकंनी खाजगी वाहनातून शहागड येथे दवाखान्यात आणले होते. पंरतू डॉक्टरांनी दोंघींनाही तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती पोलीस उपनिरीक्षक गणेश जागडे,शाकेर सिद्दिकी यांना मिळताच घटनास्थळ पंचनामा करुन गोंदी पोलीस ठाण्यात अकस्मात मदतीची नोंद घेण्यात आलेली आहे.

कमल सुभाष भालेराव ही मुलगी हालदोला ता. बदनापूर जि.जालना येथील असून ती ऊसतोडी करण्यासाठी आपल्या आई-वडिलासोबत गोदी जवळील ईदगाहाजवळ राहत होती. तर असरिन हुसेन शेख ही मुळची गेवराई जि.बीड येथील असून ती मागील चार वर्षांपासून गोंदी जवळील इदगाह जवळ राहत आहे. यावेळी शहागडचे वैद्यकीय अधिकारी मरकड, वैद्यकीय अधिकारी डॉ. बिराजदार यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;