मीठगवाणे सागरी महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, सात महिला गंभीर जखमी

मीठगवाणे सागरी महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, सात महिला गंभीर जखमी

राजापूर तालुक्यातील मीठगवाणे येथील सागरी महामार्गावर बुधवारी सकाळी 9.15 वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून सात महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.

वाघ्रण येथून बागकामासाठी जानशी पठाराकडे निघालेल्या महिलांचा टेम्पो समोरून जात असलेल्या लक्झरी बसला ओव्हरटेक करत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे वाहन उलटले आणि सुमारे 100 ते 150 फूट फरफटत गेले. या अपघातात टेम्पोतील सर्व महिला व एक छोटी मुलगी गंभीर जखमी झाली. तसेच टेम्पोचालक आणि केबिनमधील इतर पुरुष प्रवासीही जखमी झाले.

सर्व जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटल येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सागरी पोलीस ठाण्याचे पथक, पोलीस सहाय्यक निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली, घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आणि स्थानिकांनी मिळून बचावकार्य केले. या प्रकरणाचा पुढील तपास सागरी पोलीस करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;