पाकिस्तानमध्ये खैबर पख्तूनख्यामध्ये आत्मघाती हल्ला, 6 चिनी नागरिकांचा मृत्यू
पाकिस्तानमध्ये आत्मघाती हल्ल्यांचे प्रमाण वाढले आहे. आज पाकिस्तानमध्ये खैबर पख्तूनख्यामध्ये भीषण आत्मघाती हल्ला करण्यात आलेला आहे. या हल्ल्यात सहा चिनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
पाकिस्तानच्या सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तरी पाकिस्तानमध्ये आत्मघाती दहशतवाद्यांनी चीनी नागरिकांच्या वस्त्यांवर आत्मघाती हल्ला केला आहे. ज्यात मोठा स्फोट होऊन सहा चीनी नागरिकांचा मृत्यू झाला आहे, मात्र या हल्ल्यात अद्याप कितीजण जखमी झाले आहेत याबाबत स्पष्ट आकडेवारी कळलेली नाही. क्षेत्रीय पोलीस अधिकारी मोहम्मद अली यांनी रॉयटर्य या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, आत्मघाती दहशतवाद्याने स्फोटांनी भरलेले एक वाहनाने चीनी इंजिनीयरच्या एका ताफ्यावर धडक दिली. सर्व चीनी इंजिनीअर इस्लामाबादच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील दासू येथे आपल्या शिबीरात जात होते.
पुढे मोहम्मद अली म्हणाले, हल्ल्यात सहा चीनी नागरिक आणि त्यांचे पाकिस्तानी चालक मारले गेले आहेत. ते म्हणाले दासू येथे प्रमुख बांध आहे आणि या परिसरात अशाप्रकारचे हल्ले झालेले आहेत. 2021 साली एका बसमध्ये झालेल्या स्फोटात चीनी नागरिकांसोबत 13 लोकांचा मृत्यू झाला होता.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List