मुलांच्या तोंडचा सरकारी तांदूळ आफ्रिकेत पोहोचवतंय कोण? अंबादास दानवे यांचे छगन भुजबळ यांना पत्र
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी मुंबईतील जे.व्ही ग्रेन्स डीलर्स या नोंदणीकृत संस्थेकडून सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडली आहे. मुलांच्या तोंडचा सरकारी तांदूळ थेट आफ्रिकेत कोण पोचवतंय, पाहू हे सरकारला ज्ञात आहे का? असा सवाल करत सरकारतर्फे कोणीही जबाबदार माणसाने यावे आणि या ‘भ्रष्टाचार पे चर्चा’ करावी! जागा आणि वेळ तुम्हीच ठरवा! असे आव्हानच दानवे यांनी दिले.
जे. वी. ग्रेन्स डीलर्स ही नोंदणीकृत संस्था सामाजिक कार्यासाठी नोंदवली गेली. पण पहा, या संस्थेला मुंबई जिल्ह्यातील तांदूळ वाहतुकीचे कंत्राट देण्यात आले. या संस्थेचे अनिलकुमार गुप्ता यांची संस्थेबाबत वृत्ती ‘वरून सज्जन, आतून चोर’ अशीच आहे. संस्थेला होणार नफा सामाजिक उपक्रमासाठी वापरण्याऐवजी तो स्वतःच्या फायद्यासाठी वापरत असल्याचे समोर आले आहे. हे ऑडिटच्या शेअर होल्डींगच्या नमुन्यातून सूर्यप्रकाशासारखे स्पष्ट झाले आहे, असे दानवे यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. ट्रस्टच्या आर्थिक व्यवहारांचे फॉरेंसिक ऑडिट करण्यात यावे. धर्मादाय आयुक्तांनी सदर ट्रस्टची नोंदणी रद्द करण्याची प्रक्रिया सुरू करावी. सार्वजनिक टेंडर प्रक्रियेत झालेल्या सर्व अनियमिततेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जावी व धर्मादाय आयुक्त कार्यालयास फौजदारी कारवाई सुरू करण्याचे निर्देश द्यावेत. हे अतिशय गंभीर स्वरूपाचे असून खात्यामार्फत चौकशी करून एस. आय. टी. नेमावी व संबंधित कंपनीच्या मालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी दानवे यांनी अन्न व नागरी पुरवठा विभागाकडे केली आहे.
हे विस्तृत पत्र. pic.twitter.com/n6s3eq0UXx
— Ambadas Danve (@iambadasdanve) August 13, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List