चंद्रपुरात पावसाचा कहर; बामणवाड्यातील अनेक घरात शिरले पाणी, प्रशासनाचे दुर्लक्ष

चंद्रपुरात पावसाचा कहर; बामणवाड्यातील अनेक घरात शिरले पाणी, प्रशासनाचे दुर्लक्ष

चंद्रपूर जिल्हात मागील जोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसाने नदी, नाले ओसंडून वाहू लागले आहेत. बामनवाडा गावातील अनेक घरात पावसाचे पाणी शिरले आहे. महाराष्ट्र-तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या बामणी ते लक्कडकोट या महामार्गावरील पूलाचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामुळे राजुरा तालुक्यातील बामनवाडा येथील अनेक कॉलनी जलमय झाल्या आहेत. त्यामुळे हे विकासकामामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

स्नेहदीप कॉलनी, चारपत्ता गोडाऊन, स्टेलामारी कॉन्व्हेंट,तक्षशिला नगर, नालंदा नगरी,बिरसामुंडा कॉलनीला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले.अनेक घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. महामार्गाचा चुकीच्या कामामुळे पाण्याचा विसर्ग थांबल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. घरातून बाहेर पडणे नागरिकांना कठीण झाले आहे. उद्भवलेल्या परिस्थितीची प्रशासनाला वारंवार माहिती बामणवाड्यातील नागरिकांनी दिली. मात्र प्रशासनाने अद्यापही या गंभीर समस्येकडे लक्ष न दिल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;