‘रामायण’ सिनेमासाठी रणबीर कपूर घेतोय तिरंदाजीचे धडे
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या ‘अॅनिमल’ सिनेमामुळे चर्चेत आला आहे. रणबीर त्याचा आगामी ‘रामायण’ सिनेमात भगवान रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या रणवीर त्याच्या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेत असून सध्या तो तिरंदाजीचे धडे घेत आहे. नुकतेच त्याने आपल्या प्रशिक्षकासोबतचे फोटो शेअर केले आहेत.
एका फॅन पेजने सोशल मीडिया साईट एक्सवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये रणबीर कपूर तिरंदाजी प्रशिक्षकासोबत पोज देताना दिसत आहे. रणवीर यामध्ये कॅज्युअल कपड्यांमध्ये दिसत आहे. त्याने ग्रे रंगाचा टीशर्ट आणि शॉर्ट्स घातल्याचे दिसत आहेत.
याआधी शनिवारी रणबीरच्या फिटनेस प्रशिक्षकाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. ज्यामध्ये तो वर्कआऊट करताना दिसत आहे. तेव्हा तो शीर्षासन करत होता. प्रशिक्षकाने कॅप्शनमध्ये लिहीले की, ‘#ranbirkapoorFirst Headstand #ramayan #newskill #trainingwithnam #prep. असे हॅशटॅगने कळले की, रणबीर त्याचा आगामी सिनेमा ‘रामायण’ मध्ये परफेक्ट शरीरयष्ठीसाठी मेहनत घेत आहे.
RK with
archery coach
#recentclicks pic.twitter.com/aBBLfkLa49
— Ranbir Kapoor
(@Khushali_rk) March 25, 2024
सिनेमाचे दिग्दर्शक नितेश दिवारी आहेत. रामायण या सिनेमामध्ये साई पल्लवी सीतेचा भूमिकेत दिसणार असून केजीएफ फेम यश हा रावणाच्या भूमिकेत दिसणार आहे. वृत्तानुसार, सनी देओल हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहे, लारा दत्ता कैकयी आणि रकुल प्रीत शूर्पणकेच्या भूमिकेत दिसणार आहे. मात्र सिनेनिर्मात्यांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. या सिनेमाची रामनवमी दिवशी घोषणा होऊ शकते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
archery coach 


(@Khushali_rk)
Comment List