महाराष्ट्र पोलीस दलात 15 हजार पदांची भरती, बेरोजगार मराठी तरुणांनो, वाचा आणि तयारीला लागा!

महाराष्ट्र पोलीस दलात 15 हजार पदांची भरती, बेरोजगार मराठी तरुणांनो, वाचा आणि तयारीला लागा!

पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या राज्यातील हजारो तरुणांची गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेली प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र पोलीस दलात तब्बल 15 हजार पोलिसांची मेगाभरती करण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. यामुळे मागील काही महिन्यांपासून पोलीस भरतीची तयारी करणाऱया तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलातील शिपाई संवर्गाची पदे अत्यंत महत्त्वाची आहेत. पदे रिक्त राहिल्यास पोलिसांवरील कामाचा ताण वाढतो. पोलीस दल व कारागृहातील स्थिती सुधारण्यासाठी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयानेही वेळोवेळी ही पदे वेळेत भरली जावीत असे निर्देश दिले आहेत. लोकप्रतिनिधी तसेच विधिमंडळातील चर्चेतही लोकप्रतिनिधींकडून ही पदे तातडीने भरण्याची मागणी करण्यात येत होती. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांची रिक्त पदे भरण्याची घोषणा केली होती. दरम्यान, आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र पोलीस दलात तब्बल 15 हजार पोलिसांची भरती करण्यास मान्यता देण्यात आली.

भरण्यात येणारी पदांची संख्या

  • पोलीस शिपाई 10,908
  • पोलीस शिपाई चालक 234
  • बॅण्डस्मन 25
  • सशस्त्र पोलीस शिपाई 2,393
  • कारागृह शिपाई 554

वय ओलांडलेल्यांना संधी

भरतीमध्ये 2022 व 2023 मध्ये संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही एक वेळची विशेष बाब म्हणून अर्ज करता येणार आहे व भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे.

राज्याच्या पोलीस दलात सन 2024 दरम्यान रिक्त असलेली व 2025 मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन ही भरती करण्यात येणार आहे.

पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई ही पदे गट–क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया ही जिल्हास्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल, असे नमूद करण्यात आले आहे.

भरतीसाठी अर्ज मागवणे, अर्जाची छाननी, त्यावर प्रक्रिया तसेच उमेदवारांची शारीरिक परीक्षा, त्यातून पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा यासाठी अनुषांगिक प्रक्रिया राबविण्याचे अधिकार प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना देण्यात आले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;