भाजप ED च्या पदराआडून अजून किती रडीचा डाव खेळणार? शिवसेनेचा घणाघात

भाजप ED च्या पदराआडून अजून किती रडीचा डाव खेळणार? शिवसेनेचा घणाघात

Uddhav Thackeray Shiv Sena News :

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मद्य धोरण घोटाळ्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. भाजप ईडीचा वापर करून विरोधी पक्षातील नेत्यांना टार्गेट करत आहे. भाजपची केंद्रात सत्ता आल्यापासून आतापर्यंत एकूण 121 राजकीय नेत्यांवर कारवाया झाल्याअसून त्यातील 115 नेते हे विरोधी पक्षातील असल्याचे समोर आले आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने भाजपवर सडकून टीका केली आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून एक पोस्ट शेअर करत भाजपला फटकापरे आहे. ”भाजपने शासकीय यंत्रणांमार्फत खास करून ‘ईडी‘मार्फत विरोधी पक्षांवर केलेल्या कारवाया या आता जग जाहीर आहेत. सरकारी बळाचा धाक दाखवायचा आणि विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांवर दबाव टाकून त्यांना गळाला लावायचं, हा भाजपचा ईडीचा नव्हे तर रडीचा डावच म्हणावा लागेल’, अशी टीका शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

या पोस्टसोबत शिवसेने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत त्यांनी 2014 पासून आतापर्यंत ईडीमार्फत झालेल्या कारवायांची माहिती दिली आहे. भाजपची केंद्रात सत्ता आल्यापासून आतापर्यंत एकूण 121 राजकीय नेत्यांवर कारवाया झाल्याअसून त्यातील 115 नेते हे विरोधी पक्षातील आहेत. त्यात 1 मुख्यमंत्री, 14 माजी उपमुख्यमंत्री, 19 मंत्री, 7 माजी खासदार, 11 माजी आमदार, 24 विद्यमान खासदार, 21 विद्यमान आमदार यांचा समावेश आहे. ईडीच्या 95 टक्के कारवाया विरोधी पक्षांतील नेत्यांवर आहेत. काँग्रेस 24, तृणमूल काँग्रेस 19, राष्ट्रीय जनता दल 5, बिजू जनता दल 6, डीएमके 6, राष्ट्रवादी काँग्रेस 11, शिवसेना 8, मनसे 1 नेत्यांवर कारावाया झाल्या. यातले बहुतांश नेते आता भाजपमध्ये आहेत. त्यामुळे आता भाजप ईडीच्या पदराआडून अजून किती रडीचा डाव खेळणार? असा सवाल शिवसेनेने केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;