देवरुख पोलिसांचा थरारक पाठलाग ! गुटख्याने भरलेली गाडी हातखंबा येथे पकडली; 8 लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघे ताब्यात

देवरुख पोलिसांचा थरारक पाठलाग ! गुटख्याने भरलेली गाडी हातखंबा येथे पकडली; 8 लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघे ताब्यात

रात्रीच्या काळोखात गुटखा विक्रीसाठी देणाऱ्या गुटखा माफियांना पोलीसांचा थरारक पाठलाग करून दणका दिला. देवरूख पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने, हातखंबा ग्रामीण पोलीसांच्या मदतीने, तब्बल 8 लाखांहून अधिक किमतीचा गुटखा हातखंबा येथे जप्त केला. यामध्ये 3 लाखांचा गुटखा आणि 5 लाखांची गाडी असा एकूण 8 लाखांचा समावेश आहे. देवरूख पोलिसानी चौघांना ताब्यात घेतले आहे.

सोमवारी मध्यरात्री 2.30 च्या सुमारास गस्त घालत असताना दाभोळे येथे कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणारी गाडी संशयास्पदरीत्या उभी असल्याचे देवरुख पोलीसांच्या निदर्शनास आले. चौकशीसाठी पोलीस जवळ जाताच चालकाने गाडी वेगात पळवली. क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठलाग सुरू केला आणि हातखंबा ग्रामीण पोलीसांना याची माहिती दिली. संयुक्त कारवाईत हातखंबा येथे गाडी अडवण्यात आली. झडती दरम्यान विक्रीसाठी बेकायदेशीर गुटखा आढळून आला. गाडीतील चौघांना ताब्यात घेत गाडी व गुटखा असा एकूण 8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी अंमली पदार्थ व बेकायदेशीर वस्तू विरोधी मोहिमेला गती दिली आहे. या दृष्टीने तालुक्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यात गुन्हेगारीवर वचक ठेवण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. या यशस्वी धाडसी कारवाईबद्दल देवरूख पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;