Skin Care – चेहऱ्यावर आठवडाभर ‘ही’ वस्तू लावाल तर तुमचाही चेहरा होईल सुंदर

Skin Care – चेहऱ्यावर आठवडाभर ‘ही’ वस्तू लावाल तर तुमचाही चेहरा होईल सुंदर

धूळ आणि प्रदूषणामुळे चेहऱ्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. आपला चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा मानला जातो. म्हणूनच चेहरा सुंदर असावा याकरता स्त्रियांसोबत पुरुषही आता सज्ज झालेले आहेत. चेहऱ्यावर नैसर्गिक चमक यावी म्हणून आपण अनेक प्रकारची सौंदर्यप्रसाधने वापरतो. परंतु अशा सौंदर्यप्रसाधनांमुळे आपला खिसा हलका होतो आणि त्याचा हवा तसा रिझल्टही मिळत नाही. म्हणूनच चेहऱ्यावर नैसर्गिक चमक यावी याकरता घरातील ओटस् खूप गुणकारी ठरणार आहेत. नैसर्गिक चमक मिळविण्यासाठी आपण ओट्स आणि दह्याचा वापर करु शकतो. ओट्स आपल्या चेहऱ्याची खोलवर साफसफाई करण्यास मदत करतात. तसेच त्वचेची समस्या कमी करण्यासाठी दही हे खूपच प्रभावी मानले जाते.

चेहऱ्यावर नैसर्गिक चमक कशी मिळवाल?

सर्वात आधी आपला चेहरा दह्याने स्वच्छ करावा लागेल. एका भांड्यात 2 चमचे घट्ट दही घ्या. याने चेहऱ्याला हलके मसाज करा. कमीत कमी दोन मिनिटे मालिश करायला विसरू नका. यानंतर, साध्या पाण्याने चेहरा धुवा.

Beauty Tips- रात्री झोपताना चेहऱ्याला ‘हे’ तेल लावल्याने मिळतील खूप सारे फायदे, वाचा

चेहरा धुतल्यानंतर आपण दही आणि साखरेचा स्क्रब बनवायचा आहे. याकरता एका भांड्यात 2 चमचे ओट्स घ्या. त्यात काही साखरेचे दाणे घाला. थोडे दही घाला आणि 3 ते 4 मिनिटे चांगले मसाज करा. ओट्स आणि साखरेमध्ये असलेले बारीक कण त्वचेला खोलवर स्वच्छ करतात. यामुळे त्वचा चांगली स्वच्छ होते आणि चेहराही उजळतो.

स्क्रबिंगनंतर तिसरी पायरी म्हणजे मसाज. यासाठी तुम्ही पपईची क्रीम बनवू शकता. क्रीम बनवण्यासाठी एका भांड्यात 3 चमचे पपई प्युरी घ्या. आता त्यात 1चमचा बारीक वाटलेली ओट्स पावडर घ्या. त्याची पेस्ट बनवा आणि चेहऱ्यावर लावा. तुम्हाला याने तुमच्या चेहऱ्याला किमान 10 ते 15 मिनिटे मसाज करावा लागेल. ते सुकल्यानंतर, साध्या पाण्याने चेहरा धुवा आणि फरक पहा.

Beauty Tips – खास सणा-समारंभात सुंदर दिसण्यासाठी फक्त या गोष्टी फाॅलो करा, वाचा

सर्वात शेवटी तुम्हाला ओट्स आणि दह्याचा फेस मास्क वापरावा लागेल. तुम्ही ते आठवड्यातून 3 ते 4 वेळा लावू शकता. फेस मास्क बनवण्यासाठी, एका भांड्यात थोडे दही घ्या. त्यात 2 चमचे ओट्स पावडर आणि थोडे मध घाला. त्याची पेस्ट बनवा आणि ती चेहरा आणि मानेवर लावा आणि 15 मिनिटे तसेच ठेवा.

फेशियल केल्यानंतर चेहऱ्यावर हलके मॉइश्चरायझर लावायला विसरू नका. यामुळे तुमची त्वचा कोरडी होणार नाही. जर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचे नसेल तर तुम्ही अ‍ॅलोवेरा जेल देखील लावू शकता.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;