संगमेश्वरमध्ये कारभाटले घोरपडेवाडीजवळ एसटी बस- टेम्पोची धडक; टेम्पोचालकावर गुन्हा दाखल

संगमेश्वरमध्ये कारभाटले घोरपडेवाडीजवळ एसटी बस- टेम्पोची धडक; टेम्पोचालकावर गुन्हा दाखल

संगमेश्वर तालुक्यातील कारभाटले घोरपडेवाडी येथे सोमवारी संध्याकाळी एसटी बस आणि महिंद्रा सुप्रो गाडीची धडक झाली. या अपघातात सुप्रो गाडीचा चालक जखमी झाला असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात सोमवारी संध्याकाळी ४.३५ च्या सुमारास घडला. एसटी चालक अप्पासो कल्लाप्पा कोळी (वय ३५) बस घेऊन संगमेश्वरहून कातुर्डीच्या दिशेने जात होते. कारभाटले घोरपडेवाडी येथे रस्ता अरुंद रस्त्यावर समोरून येणाऱ्या महिंद्रा सुप्रो गाडीने एसटी बसला जोरदार धडक दिली. हा अपघात सुप्रो गाडी चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे एसटी चालक कोळी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सुप्रोचा चालक यश सतीश विभुते (वय २५, रा. कळंबस्ते) याने अरुंद रस्त्यावर भरधाव वाहन चालवल्याने अपघात झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या अपघातात यश विभते किरकोळ जखमी झाला असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी एसटी चालक अप्पासो कोळी यांच्या तक्रारीनुसार टेम्पो चालकावर संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;