आराध्या रुसल्यानंतर अभिताभ बच्चन यांना करावं लागतं असं काम, जाणून व्हाल अवाक्

आराध्या रुसल्यानंतर अभिताभ बच्चन यांना करावं लागतं असं काम, जाणून व्हाल अवाक्

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अमिताभ बच्चन यांच्या चाहते फक्त भारतात नाहीतर, जगभरात आहेत. त्यामुळे अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाबद्दल देखील जाणून घेण्याची उत्सुकता चाहत्यांमध्ये असते. अमिताभ बच्चन कुटुंबातील अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करतात. पण अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांची लेक आराध्या बच्चन हिच्याबद्दल देखील बिग बी अनेकदा बोलताना दिसतात. व्यस्त वेळापत्रकामुळे अमिताभ बच्चन यांना नात आराध्या हिच्यासोबत अधिक वेळ व्यतीत करता येत नाही. पण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा बिग बी नात आराध्या हिच्यासोबत असतात.

रुसलेल्या आराध्याला कसं मनवतात अमिताभ बच्चन

‘कोन बनेगा करोडपती’ शोच्या एका एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांना विचारण्यात आलं होतं की, आराध्या हिच्यासोबत तुम्ही कशी वेळ व्यतीत करता. यावर बिग बी म्हणाले, ‘तिच्यासोबत मला अधिक वेळ व्यतीत करता येत नाही. कारण मी सकाळी सात वाजता माझ्या कामासाठी निघतो. आराध्या 8 वाजता शाळेत जाते. त्यानंतर 3 -4 वाजेपर्यंत घरी येते. घरी आल्यानंतर तिचा अभ्यास असतो, तो करते…’

‘आराध्याची आई तिच्याकडून सर्वकाही करून घेते. त्यानंतर मी रात्री 10-11 वाजता घरी जातो. तोपर्यंत आराध्या झोपलेली असते. त्यामुळे तिची आणि माझी भेट होत नाही… आता जग फार पुढे गेलं आहे. त्यामुळे व्हिडीओ कॉल करून तिच्यासोबत बोलण होतं. पण रविवारी आराध्या हिच्याकडे वेळ असतो आणि माझं देखील कधी रविवारी शूट नसेल, तर मी तिच्यासोबत पूर्ण दिवस व्यतीत करतो. मी नातीसोबत खळतो..’

बिग बी पुढे म्हणाले, ‘आराध्या कधी रागावलेली असेल तर मी तिला चॉकलेट देतो. केसात महिला लावतात ते हेयरबँड मी आराध्याला देतो. तिला गुलाबी रंग प्रचंड आवडतो. गुलाबी रंगाचा हेअरबँड दिल्यानंतर ती खूप आनंदी होते…’ असं देखील बिग बी नात आराध्या बच्चन हिच्याबद्दल बोलले होते.

अमिताभ बच्चन यांचे आगामी सिनेमे

वयाच्या 81 व्या वर्षी देखील अमिताभ बच्चन बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. काही दिवसांपूर्वी बिग बी ‘गणपत’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आले होते. सिनेमात बिग बींसोबत टायगर श्रॉफ आणि कृती सनॉन यांनी देखील मुख्य भूमिका साकराली होती. पण सिनेमा बॉक्स ऑफिसवर फेट ठरला.. आता बिग बी The Umesh Chronicles, कल्कि 2898 AD, बटरफ्लाय आणि Vettaiyan सिनेमांच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;