दिल्लीत डिनर डिप्लोमसी; मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दिसली ‘इंडिया’ आघाडीच्या एकीची वज्रमूठ

दिल्लीत डिनर डिप्लोमसी; मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी दिसली ‘इंडिया’ आघाडीच्या एकीची वज्रमूठ

मतचोरीच्या विरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांनी सोमवारी निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. जवळपास 300 खासदार या मोर्चामध्ये सहभागी झाले होते. या मोर्चानंतर सायंकाळी राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या खासदारांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या एकीची वज्रमूठ दिसली.

मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी आयोजित डिनर पार्टीचे फोटो काँग्रेसने आपल्या अधिकृत एक्स (आधीचे ट्विटर) अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या डिनर पार्टीचे वर्णन काँग्रेसने जेवणापेक्षाही खास आणि इंडिया आघाडीच्या एकतेचे शक्तीशाली प्रतिपादन असे केले. या डिनर पार्टीमध्ये संविधानाचे समर्थन करण्यासाठी आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी असलेली सामूदायिक वचनबद्धता, सौदार्ह, परस्पर आदत आणि अढळ संकल्प दिसून आला, असेही काँग्रेसने म्हटले. या डिनर पार्टीला इंडिया आघाडीतील पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनीही प्रमुख नेत्यांशी चर्चाही केली.

मतचोरीचा आरोप आणि बिहारमधील निवडणूक याद्यांच्या फेरतपासणीत सुरू असलेल्या घोटाळ्या संदर्भात सोमवारी इंडिया आघाडीने निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. यावेळी पोलिसांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतले. त्यानंतरही इंडिया आघाडीच्या नेत्यांनी दणदणीत मोर्चा काढला.

दिल्लीतील मोर्चा झाल्यानंतर सायंकाळी खरगे यांच्या निवासस्थानी डिनर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या डिनरला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत, खासदार प्रियंका चतुर्वेदी, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, खासदार जया बच्चन, आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह, खासदार पप्पू यादव यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.

दरम्यान, डिनर डिप्लोमसीनंतर आप खासदार संजय सिंह यांनी एक्सवर आपली भूमिका मांडली. आम्ही एसआयआरच्या मुद्द्यावर एकत्र असून सर्व विरोधक एकजूट आहोत. दिल्लीसह देशभरातील निवडणुका घोटाळा करून जिंकल्याचा लोकांची धारणा असल्याचे ते म्हणाले.

बुलंद नारा! एक व्यक्ती, एक मत; मतचोरीविरोधात निवडणूक आयोगावर इंडिया आघाडीचा दणदणीत मोर्चा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;