पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांचे सूचक ट्विट

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर खासदार संजय राऊत यांचे सूचक ट्विट

बिहारमधील मतदार यादीच्या पुनरचना (SIR) आणि कथित ‘मत चोरी’ विरोधात सोमवारी विरोधी पक्षांच्या इंडिया अलायन्सच्या खासदारांनी संसद भवनापासून निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. यानंतर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी वाड्रा, सपा प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक विरोधी नेत्यांना ताब्यात घेतले.

संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चामध्ये सहभागी झालेल्या अनेक खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या नेत्यांमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचाही समावेश आहे. याशिवाय लोकसभा आणि राज्यसभेतील अनेक खासदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या तरी हा मोर्चा थांबला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनाही पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले.

यावेळी खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत, अटक! असे म्हटले आहे. संसद मार्ग पोलिस स्टेशनमध्ये या सर्व खासदारांना घेऊन जाण्यात आले होते. खासदारांचा मोर्चा रोखण्यात आला तेव्हा, अखिलेश यादव बॅरिकेड्सवरून उडी मारून गेले. याशिवाय राहुल गांधी पोलिसांच्या बसमधूनच गर्जना करत म्हणाले की, आमचा लढा सुरूच राहील! आमचा लढा राजकीय नाही तर संविधान वाचवण्यासाठी आहे.

मल्लिकार्जून खरगे, राहुल गांधी, अखिलेश यादव, प्रियांका गांधी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. यादरम्यान राहुल गांधी म्हणाले की आम्हाला बोलूही दिले जात नाही. विरोधी पक्षाच्या खासदारांचे म्हणणे आहे की, ते निवडणूक कार्यालयात जात होते, परंतु त्यापूर्वीच त्यांना थांबवण्यात आले. यानंतर, त्यांना बसमध्ये नेण्यात आले. त्यांना सध्या संसद मार्ग पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;