एक मोठा नेता महाशक्तीकडून हळूहळू संपवला जातोय; रोहित पवार यांचा अजित पवारांना सूचक इशारा

एक मोठा नेता महाशक्तीकडून हळूहळू संपवला जातोय; रोहित पवार यांचा अजित पवारांना सूचक इशारा

अजित पवार काही आमदारांसह राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात अजित पवार गटाला किती जागा येणार, याची चर्चा सुरू आहे. तसेच एकेका जागेसाठी अजित पवार यांना दिल्लीला जावे लागत आहे. तसेच शिंदे गटाएवढ्याच जागा आम्हाला पाहिजे, अशी मागणी अजित पवार यांच्या गटाने केली आहे. त्यामुळे अपेक्षित जागा मिळवण्यासाठी अजित पवार यांना संघर्ष करावा लागत आहे. या सर्व घटनांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांना धोक्याचा सूचक इशारा दिला आहे. एक मोठा नेता महाशक्तीकडून हळूहळू संपवला जातोय, असा इशारा रोहित पवारांनी दिला आहे.

रोहित पवार यांनी याबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, एरवी रुबाबदारपणे तिकिटं वाटणाऱ्या हातांना आज तिकिटांसाठी हात पुढं करावे लागत असतील आणि तेही हातात चाराणे टेकवल्याप्रमाणे चार तिकिटं पडत असतील तर त्या रुबाबदार हातांना मानणाऱ्यांचाही हा अवमान आहे. एकेकाळचा त्यांचा फॅन आणि कार्यकर्ता म्हणून दुःख या गोष्टीचं वाटतं की, एक मोठा नेता #महाशक्ती कडून हळूहळू संपवला जातोय.. आज लोकसभेला #मॅनेज करतील आणि उद्या विधानसभेला पूर्णपणे #डॅमेज करतील…

असे ट्विट करत रोहित पवार यांनी अजित पवार यांना महाशक्तीकडून संपवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे म्हटले आहे. महायुतीत त्यांना एकेका जागेसाठी संघर्ष करावा लागत आहे. तसेच लोकसभा निवडणुकांसाठी ते मॅनेज करतील आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी डॅमेज करतील, असा इशारा देत एक मोठा नेता महाशक्तीकडून संपवला जातोय, याबाबत खंत वाटत असल्याचेही राहित पवार यांनी म्हटले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;