विमानाप्रमाणे ट्रॅक्टरमध्येही ब्लॅकबॉक्स सक्ती; शेतकऱ्यांवर 30-50 हजारांचा भुर्दंड पडणार, केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध  

विमानाप्रमाणे ट्रॅक्टरमध्येही ब्लॅकबॉक्स सक्ती; शेतकऱ्यांवर 30-50 हजारांचा भुर्दंड पडणार, केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध  

विमानांप्रमाणेच आता ट्रक्टर ट्रॉलीमध्येही ब्लॅकबॉक्स व जीपीएस प्रणाली बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने तशी अधिसूचना काढली आहे. याचा मोठा फटका देशातील लाखो शेतकऱ्यांना बसणार आहे. शेतकऱ्यांवर 30 ते 50 हजारांचा आर्थिक भुर्दंड पडणार असल्यामुळे या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे. 

1989च्या केंद्रीय मोटर वाहन कायद्यात बदल करून हे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक ट्रक्टरमध्ये जीपीएस ट्रकिंग डिव्हाईस, एआयएस-140 प्रमाणित लोकेशन ट्रकर बसवणे आवश्यक आहे. तसेच अपघाताची नोंद ठेवण्यासाठी ‘इव्हेंट डेटा रेकॉर्डर’ (ब्लॅकबॉक्स) अनिवार्य केले आहे. ट्रॉलीसाठी नवे महागडे मेपॅनिकल कपलिंग व इलेक्ट्रिकल कनेक्टरही लावावे लागणार आहे.

हा शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा 

ही अधिसूचना म्हणजे शेतकऱ्यांच्या खिशावर दरोडा आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या  ट्रॅक्टरसाठी ही तांत्रिक साधने पूर्णतः अनावश्यक आहेत. शेतीमध्ये फक्त 10-15 किमी वेगाने वापरला जाणारा ट्रक्टर कुठल्या अपघाताचे रेकॉर्ड ठेवणार? शहरात बसलेले अधिकारी नियम तयार करताना शेतकऱ्यांचे वास्तव विसरतात, असा संताप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. 

हरकत घेता येणार! 

केंद्र सरकारने या निर्णयावर हरकती व सूचनाही मागवल्या असून त्यासाठी 18 ऑगस्टची मुदत दिली आहे. या सूचना परिवहन व रस्ते सुरक्षा विभागाच्या अपर सचिवांना परिवहन भवन, संसद मार्ग, नवी दिल्ली – 110001 या पत्त्यावर पाठवता येतील. 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;