अमेरिकेत बाल्टीमोर येथे जहाजाच्या धडकेने पूल कोसळला, अनेक गाड्या पाण्यात पडल्या

अमेरिकेत बाल्टीमोर येथे जहाजाच्या धडकेने पूल कोसळला, अनेक गाड्या पाण्यात पडल्या

अमेरीकेतील बाल्टीमोर शहरात एक मोठा अपघात घडला आहे. कंटेनर जहाजाची पूलाला धडक लागून जहाजाच्या धडकेने एक मोठा पूल कोसळला आहे. या भयंकर अपघाताने पूलावरील अनेक गाड्या पाण्यात पडल्या. बचावकार्य पाण्यात पडलेल्या सात लोकांचा शोध घेत आहे.

सोशल मीडीया साईट एक्सवर सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत फ्रान्सिस स्कॉट जहाज एका पूलाला टक्कर देतं. ज्यामध्ये तो पूल अनेक ठिकाणी कोसळला आहे. या धडकेने जहाजाला आग लागली आणि जहाज पाण्यात बुडताना दिसत आहे. बाल्टीमोर अग्निशमन विभागाच्या संवाद संचालक केविन कार्टराईट याने माध्यमांना सांगितले की, ही एक गंभीर समस्या आहे. सध्या लोकांचा बचाव करण्याकडे आमचे लक्ष्य आहे, व्हिडिओ पाहिल्यावर काही सामान पुलावरुन लटकत असल्यासारखे दिसत आहे.

कार्टराईट पुढे म्हणाले, बचावकार्य पाण्यात पडलेल्या सात लोकांचा शोध घेत आहे. एजन्सींना रात्री उशीरा साधारण दीडच्या सुमारास वर एक फोन आला. त्यावर बाल्टीमोर येथून जाणारं एक जहाज पूलाच्या खांब्याला धडकले आणि पूल कोसळला. यावेळी पूलावर अनेर वाहने होती आणि त्यात ट्रेलर ट्रकही होता. पटाप्सको नदीवर हा पूल 1977 साली सुरु झाला आहे, या पूलाचे नाव ‘द स्टार स्पॅंगल्ड बॅनर’ असे असून एका लेखकाच्या नावावरुन या पूलाला नाव दिले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;