चीनमध्ये शास्त्रज्ञ आईनस्टाईनसारखे रोबोट विक्रीला; माणसासारखे बोलणारे, चालणारे 100 रोबोट्स

चीनमध्ये शास्त्रज्ञ आईनस्टाईनसारखे रोबोट विक्रीला; माणसासारखे बोलणारे, चालणारे 100 रोबोट्स

चीनची राजधानी बीजिंगमध्ये रोबोट मॉल नावाने एक आगळेवेगळे स्टोअर उघडण्यात आले आहे. या मॉलमध्ये ग्राहकांना थेट रोबोटची खरेदी करता येणार आहे. या रोबोट मॉलमध्ये अगदी माणसासारखे दिसणारे, रोबोट्स खरेदी करता येत आहेत. या रोबोटमध्ये जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे 100 हून अधिक प्रकारचे वेगवेगळ्या किमतीतील रोबोट विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. या ठिकाणचे ह्युमनॉईड्स रोबोट हे सर्वसामान्य ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले आहेत. यातील बरेचशे रोबोट हुबेहूब माणसासारखे आहेत. त्यांना ओळखणेही कठीण जाते. अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्यासारखा दिसणारा रोबोट त्यांच्यासारखाच आवाज काढतो, हावभाव करतो. या मॉलमध्ये एका रोबोट्सची किंमत 2 हजार युआन म्हणजेच 23 हजार 500 रुपयांपासून सुरू होते. काही रोबोट्सची किंमत लाखांच्या घरात तर काहींची किंमत थेट एक-दोन कोटी रुपयांपर्यंत आहे.

ह्युमनॉईड रोबोट गेम्स

चीनमध्ये 14 ते 17 ऑगस्टदरम्यान वर्ल्ड ह्युमनॉईड रोबोट गेम्स स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेमध्ये 20 हून अधिक देश सहभागी होणार आहेत. यात ट्रक अ‍ॅण्ड फिल्ड, डान्स आणि फुटबॉल यासारख्या स्पर्धांमध्ये रोबोट्स भाग घेतील. रोबोट मॉलचे उद्घाटन करण्यात आल्यानंतर चीनमध्ये पाच दिवसांची वर्ल्ड रोबोट कॉन्फरन्स करण्यात आली. यामध्ये 200 हून अधिक देशविदेशी कंपन्यांनी सहभाग घेतला होता. तसेच 1500 हून अधिक रोबोटिक उत्पादनांचे प्रदर्शन करण्यात आले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;