ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे आयफोन 17 महागणार

ट्रम्प यांच्या टॅरिफमुळे आयफोन 17 महागणार

अ‍ॅपल कंपनी दरवर्षी सप्टेंबर महिन्यात आपली आयफोनची नवीन सीरिज लाँच करते. चाहत्यांना आता आयफोन 17 सीरिजची उत्सुकता लागलेली आहे, परंतु या सीरिज आधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर 50 टक्के टॅरिफ बॉम्ब फोडला आहे. या टॅरिफचा थेट परिणाम आयफोनच्या नव्या सीरिजवर होणार आहे. यामुळे एक ते दीड लाखात मिळणारा आयफोन आता महाग मिळू शकतो. 50 टक्के टॅरिफमुळे आयफोन 17 च्या सीरीजमधील फोनच्या किंमत 50 डॉलर ते 150 डॉलरपर्यंत वाढ होऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे.

अ‍ॅपलने चीन-अमेरिका वॉरपासून वाचवण्यासाठी चीनमधून बाहेर पडत हिंदुस्थानात आयफोनचे उत्पादन बनवणे सुरू केले होते, परंतु आता ट्रम्प यांनी हिंदुस्थानवर थेट 50 टक्के टॅरिफ लावला आहे. याचा फटका अ‍ॅपल कंपनीला बसणार आहे. हिंदुस्थान आणि चीन या दोन्ही देशांवर ट्रम्प नाराज असल्याने अ‍ॅपलने आता अमेरिकेत 100 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी नुकतीच डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेत ही घोषणा केली. अमेरिकन सरकारला खूश करण्यासाठी आणि भविष्यात टॅरिफपासून सुटका करण्यासाठी अ‍ॅपल कंपनीने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;