तिरू मध्यम प्रकल्पावरील पाणी उपसा करणाऱ्या 14 मोटारी, वायर जप्त

तिरू मध्यम प्रकल्पावरील पाणी उपसा करणाऱ्या 14 मोटारी, वायर जप्त

तिरू प्रकल्पातील पाणी पातळी कमी होऊ लागल्यामुळे शेतकर्‍यांनी त्यांच्या विद्युत मोटारी काढून घ्याव्या, अशी विनंती जलसंधारण प्रशासनाने केली होती. मात्र, शेतकऱ्यांनी मोटारी काढल्या नसल्यामुळे संबंधित जलसंधारण प्रशासनाने तिरू मध्यम प्रकल्पावरील शेतकर्‍यांच्या चौदा विद्युत मोटारी, वायर व सर्व साहित्य जप्त केले.

हाळी हंडरगुळी जवळील तिरू मध्यम प्रकल्पातून अनेक मोठी गावे वाढवणा बु, वाढवणा खुर्द, हाळी, शिरूर ताजबंद व बावन गावाला पिण्याचे पाणी पुरवण्यात येते. तिरू मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा आरक्षित करण्यात आला आहे. प्रशासनाने वारंवार सांगुनही बेकायदेशीरपणे चोरीच्या मार्गाने बेधडक पाणी उपसा करणार्‍या शेतकर्‍यांच्या मोटारी आणि विद्युत पुरवठा करणारी वायर आणि इतर साहित्य जप्त केले. ते सर्व साहित्य वाढवणा बु. जलसंधारणच्या मुख्यालयात आणण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;