धारलीतील बचाव कार्य पुढील दोन दिवसांत पूर्ण होईल! जाणून घ्या अपडेट

धारलीतील बचाव कार्य पुढील दोन दिवसांत पूर्ण होईल! जाणून घ्या अपडेट

उत्तरकाशीतील धराली गावात ढगफुटी झाल्यानंतर पूर आला. या पुरात गावातील घरे, इमारती वाहून गेले. अनेक नागरिक बेपत्ता झाले. गेल्या पाच दिवसांपासून धारली, हर्षिल भागात बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत 629 लोकांना वाचवण्यात आले आहे. बचाव कार्य एक ते दोन दिवसांत पूर्ण होईल.

केंद्र आणि राज्य सरकारी संस्था बाधितांना मदत करण्यात तसेच बेपत्ता लोकांचा शोध घेण्यात आणि मूलभूत सुविधा पुनर्संचयित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलिस आणि स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या यात्रेकरू आणि स्थानिक नागरिकांचे बचाव कार्य सुरू आहे.

मी धारली येथील ग्राउंड झिरोला भेट दिली. आरोग्य विभागाने छावण्या उभारल्या आहेत. मी उत्तरकाशीतील जिल्हा रुग्णालयालाही भेट देणार आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या सूचनेनुसार, आरोग्य विभाग, एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि भारतीय सैन्याच्या पथके एकत्र काम करत आहेत, असे उत्तराखंडचे आरोग्य सचिव आर. राजेश कुमार यांनी सांगितले.

धारली येथील डॉक्टर आपत्तीत जखमींवर उपचार करत आहेत. याशिवाय 28 रुग्णवाहिका आणि बॅकअप रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. 15 पैकी चार रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. बचाव कार्य एक ते दोन दिवसांत पूर्ण होईल, असे राजेश कुमार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाराष्ट्रातील यात्रेकरूंनी सैन्य आणि राज्य सरकारचे आभार मानले आहेत. प्रत्येक बाधित कुटुंबाला तात्काळ मदत म्हणून 5000 रुपये देण्यात आले आहेत. नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार केला जाईल आणि आवश्यक ती मदत लवकरच जारी केली जाईल, असे उत्तरकाशीचे जिल्हा दंडाधिकारी प्रशांत आर्य यांनी सांगितले. दरम्यान, धारली आपत्तीबाबत सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस महानिर्देशक दीपम सेठ यांनी दिले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;