Latur News – फेसबुक लाईव्ह करत तरुणाने संपवलं जीवन, लातूरमधील हृदयद्रावक घटना

Latur News – फेसबुक लाईव्ह करत तरुणाने संपवलं जीवन, लातूरमधील हृदयद्रावक घटना

फेसबुक लाईव्ह करत तरुणाने जीवन संपवल्याची घटना लातूरमधील निलंगा तालुक्यातील अंबुलगा बुद्रुक येथे घडली. छातीत सुरा खुपसून तरुणाने आत्महत्या केली. भरत बालाजी सागावे असे मयत तरुणाचे नाव आहे. तरुणाने टोकाचं पाऊल का उचलले याबाबत अद्याप समजू शकले नाही. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

भरत अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास होता. शनिवारी 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास तो निलंगा शहरातील लांबोटकर पेट्रोल पंपाजवळ आंब्याच्या झाडाखाली बसून फेसबुक लाईव्ह करत होता. फेसबुक लाईव्ह करत “मी आत्महत्या करत आहे” असे सांगत त्याने काही वेळानंतर छातीत सुरा खुपसला. नातेवाईकांनी फोन करून समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने फोन बंद केला होता.

शोध घेतल्यानंतर तो पेट्रोल पंपाजवळ रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत सापडला. त्याला तात्काळ लातूरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले, परंतु उपचार सुरू असतानाच काही वेळात त्याचा मृत्यू झाला. आत्महत्येची कारणे अद्याप अस्पष्ट आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;