Ratnagiri News – संतप्त शिवसैनिक रस्त्यावर उतरणार; भ्रष्ट तसेच रमी, चड्डी, छू छा गँगविरोधात शिवसेना स्टाईल आंदोलन
महाराष्ट्रातील महायुती सरकारच्या गलथान कारभार दररोज चव्हाट्यावर येत आहे. याविरोधात जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. भ्रष्ट सरकार आणि कमी, चड्डी, छु छा गॅंगविरोधात रत्नागिरीत शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येणार आहे. सोमवारी 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील जयस्तंभ येथे शिवसैनिक आंदोलन करणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करणार आहे. राज्याचे कृषी मंत्री रमी खेळताना सापडतात. मिंद्ये गटाचा आमदार चड्डी बनियानवर आमदार निवासच्या कॅन्टीनमधील कामागाराला मारायला जातो. गृह राज्यमंत्र्याच्या आईच्या नावावर असलेल्या डान्सबारवर धाड पडते. पैशाने भरलेली बॅग घेऊन बसलेला मंत्री हे सर्व कारनामे बाहेर पडल्यानंतर राज्यात सरकार विरोधात अंसतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सरकारच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आंदोलन करणार आहे.
महाराष्ट्रातील भ्रष्ट व गैर कृत्ये करणाऱ्या मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठीशी न घालता राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी सोमवारी शिवसैनिक रस्त्यावर उतरणार आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List