निवडणूक आयोगावर बोलले की भाजपला झोंबते, शरद पवारांच्या विधानावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

निवडणूक आयोगावर बोलले की भाजपला झोंबते, शरद पवारांच्या विधानावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. विधानसभेपूर्वी दोन लोक मला दिल्लीत भेटले आणि त्यांनी 160 जिंकण्याची गॅरंटी दिली होती, असे पवार म्हणाले. यावर आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार अनेक वर्षांपासून राजकारणामध्ये आहेत. त्यांचा अनुभव मोठा आहे. शरद पवार यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक निवडणुका पाहिल्या आहेत. पहिल्यांदा कदाचित मतचोरी जी होतेय ती एवढ्या उघडपणे झालेली असावी. साधारणपणे निवडणूक आयोग भाजपच्या कार्यालयातून चालतो हे कळायला लागलेले आहे. अनेकदा असे होते की आम्ही निवडणूक आयोगावर बोलतो आणि झोंबते भाजपला, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी लगावला. तसेच राहुल गांधी यांनी काय खरे, काय खोटे हे पुराव्यानिशी दाखवल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.

ठाकरे बंधुंच्या युतीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, दोन्ही भाऊ अनेक वर्षानंतर बोलत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलनं किंवा स्थानिक पातळीवर निवडणुका एकत्र लढत आहेत. पुढचा निर्णय दोन्ही भाऊ घेतील. मुंबई, महाराष्ट्राच्या हिताचे असेल ते नक्की होईल.

ठाकरे बंधुंची युती ‘इंडिया’ आघाडीचा विषय नाही; मराठी भाषा, अस्मिता, महाराष्ट्राचं रक्षण हाच केंद्रबिंदु! – संजय राऊत

दरम्यान, सिद्धेश शिंदे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीवर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. फेकनाथ मिंधे गटाकडून रडीचा डाव खेळला जात असून सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनाही कळत आहे. मिंधेच्या आमदाराने रॅपीडोवर कारवाईची धमकी दिली आणि त्याच्यानंतर स्वत:च्या मुलासाठी स्पॉन्सरशीप घेतली. असे जर चालत राहिले तर आपल्या राज्यात कुठले गुंतवणूकदार येणार? असा सवाल करत आदित्य ठाकरे म्हणाले की, मंत्री येतात, धमकावतात आणि स्पॉन्सरशीप घेतात. म्हणजे जबराना पण आमि नजराना पण. ही अधिकृत खंडणीत असून महाराष्ट्राला पुढे न्यायचे असेल तर सत्तेतील खंडणीखोरांना बाहेर काढावे लागेल, असेही ते म्हणाले.

हे शपथपत्र मागतायत, मी संसदेत संविधानाची शपथ घेतली आहे; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्ला

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;