रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यदिनी अलास्कामध्ये ट्रम्प-पुतीन भेटणार

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यदिनी अलास्कामध्ये ट्रम्प-पुतीन भेटणार

रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेले युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प 15 ऑगस्ट रोजी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन यांची भेट घेणार आहेत. अलास्का येथे या दोन नेत्यांची भेट होणार आहे. ट्रम्प यांनी स्वत: ‘ट्रूथ सोशल’ या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवरून पुतीन यांच्यासोबतच्या भेटीची तारीख आणि ठिकाण जाहीर केले आहे.

अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून मी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन पुढील शुक्रवारी, 15 ऑगस्ट 2025 रोजी अलास्का या महान राज्यामध्ये भेटणार आहोत. या भेटीबाबत अधिक माहिती आगामी काळात दिली जाईल. या विषयावर लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद, अशी पोस्ट ट्रम्प यांनी ‘ट्रूथ सोशल’वर लिहिली आहे.

याआधी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन युद्धाबाबत विधान केले होते. चांगल्या भविष्यासाठी काही भागांची अदलाबदल होऊ शकते, असे ते म्हणाले होते. त्यानंतर रशिया खेरसॉन आणि जापोरिज्जियातून आपले सैन्य कारवाई थांबवणार असल्याचे वृत्त ब्लूमबर्गने दिले होते.

मोदींची पुतीन यांच्याशी ‘फोन पे चर्चा’

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;