एआयचा धोका वाढला 80 हजार लोक झाले बेरोजगार, 2030 पर्यंत 1.8 कोटी नोकऱ्या जाणार

एआयचा धोका वाढला 80 हजार लोक झाले बेरोजगार, 2030 पर्यंत 1.8 कोटी नोकऱ्या जाणार

जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) ने नोकऱ्यांचा धोका वाढवला आहे. टीसीएसने 12 हजार कर्मचाऱ्यांना डच्चू दिल्यानंतर आता एआयमुळे पुढील पाच वर्षांत तब्बल 1.8 कोटी लोकांच्या नोकऱ्यांवर गंडांतर येणार आहे. त्यांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागू शकतील, अशी भीती वर्तवली जात आहे. आयटी आणि टेक सेक्टरसुद्धा नोकऱ्यांसाठी सुरक्षित राहिले नाही. जगभरात या वर्षात 80 हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. एफवायआयने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, इंटेल, मायक्रोसॉफ्ट, मेटासह एकूण 171 कंपन्यांनी आतापर्यंत 80,250 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. इंटेलने अवघ्या तीन महिन्यांत 27 हजार लोकांना कामावरून काढून टाकले आहे. मायक्रोसॉफ्टने 15 हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे. मेटानेसुद्धा आतापर्यंत 3 हजार 600 कर्मचाऱ्यांना घरी बसवले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;