ऊसतोड मजुरांची राहुट्यांवरच धुळवड साजरी; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

ऊसतोड मजुरांची राहुट्यांवरच धुळवड साजरी; महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

देशभरात होळी, धुलिवंदन सणाचा उत्साह ओसंडून वाहत असताना ऊसतोड मजुरांनीही या सणाचा आनंद घेतला. घरापासून शेकडो किलोमीटर दूर आलेल्या ऊस तोड मजुरांनी आपल्या राहूट्यांजवळच आनंदात रंगांची उधळण करत धुळवड साजरी केली. यात महिलांचा ही उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

शिरूर तालुक्यातील कवठे येमाई गावात संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातून नागदतांडा, बेलखडा, सोनवाडी, पांगरा, पिंपळवाडी,दळेलवाडी,शिंदी आदी ठिकाणांवरून ऊसतोड मजुरांचे जथ्थेच्या जथ्थे तात्पुरत्या स्वरूपात राहुट्या टाकून राहत आहेत. भिमाशंकर सहकारी साखर कारखान्यासाठी परिसरातील ऊस तोडण्याचे काम त्यांच्याकडून केले जाते. आपल्या मूळ गावापासून कामानिमीत्त शेकडो किलोमीटर दुर असल्याने सण वाराला गावाला जाणे शक्य होत नाही. त्यामुळे आपल्या कामाच्या ठिकाणीच त्यांनी धुळवड साजरी केली. गाण्यांच्या तालावर रंग खेळण्यात दंग झालेल्या लहान मुलांनी आपल्या मित्रांसह रंगांच्या पिचकाऱ्या तसेच कोरड्या रंगाची उधळण करून जल्लोष केला.

धुलीवंदनाचा सण आमच्याकडे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.सणाच्या कालावधीत गावाला खुप मजा येते. मात्र, आम्ही आता कामाला इकडे आलोय. कामाला कुठेही गेलो तरी आम्ही तेथे सण साजरे करून परंपरा जपतो, असे त्यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;