बल्लारपूरमध्ये वनरक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; फरार आरोपीला गोंदियातून अटक

बल्लारपूरमध्ये वनरक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; फरार आरोपीला गोंदियातून अटक

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात एका अल्पवयीन मुलीवर वनरक्षकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. रंजीत दुर्योधन असे आरोपी वनरक्षकाचे नाव आहे. पीडित मुलगी कॉलेज सुटल्यानंतर आपल्या मित्रासोबत दुचाकीवरून चंद्रपूरहून गावाकडे जात होती.

रस्त्यात दुचाकी बंद पडली. दोघेही दुचाकी दुरुस्त करत असताना, चंद्रपूरहून कारवाकडे जाणारा वनरक्षक रंजीत दुर्योधन त्यांच्याजवळ थांबला. त्याने मुलीच्या मित्राला खोट्या केसमध्ये अडकविण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. यानंतर, त्याने अल्पवयीन मुलीला पुढच्या गावापर्यंत सोडतो, असे सांगून सोबत घेतले आणि चंद्रपूर-जुनोना मार्गावरील जंगलात घेऊन गेला. तिथे त्याने तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला. त्यानंतर, घटनास्थळावरून पसार झाला. पीडित मुलीने पालकांसोबत बल्लारपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलीसांनी आरोपी वनरक्षकाला गोंदियातून अटक केली आहे. बल्लारपूर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;