धक्कादायक! अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या, पार्किंगवरुन झाला वाद

धक्कादायक! अभिनेत्री हुमा कुरेशीच्या चुलत भावाची हत्या, पार्किंगवरुन झाला वाद

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बॉलीवूड अभिनेत्री हुमा कुरेशीचा चुलत भाऊ आसिफ कुरेशीची हत्या करण्यात आली. स्कूटीच्या पार्किंगवरून झालेल्या छोट्या वादाचे रूपांतर हत्येत झाले. या घटनेमुळे बॉलीवूडमध्ये तसेच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या पोलीस या घटनेची चौकशी करत असून दोघांना ताब्यात घेतले आहे.

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना गुरुवारी (7 ऑगस्ट ) रात्री 11 वाजताच्या सुमारास घडली. गुरुवारी रात्री आसिफ कुरेशी आणि परिसरातील काही लोकांमध्ये पार्किंगवरून भांडण झाले. आसिफने आरोपींना घराच्या गेटबाहेर स्कूटर पार्क करू नका असे सांगितले होते, परंतु त्यांनी ते ऐकले नाही. यामुळे वाद सुरू झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की,  रागाच्या भरात आरोपींने आसिफवर धारदार शस्त्राने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले.

आरोपीने केलेल्या या हल्ल्यात आसिफ कुरेशी गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने चौकशी सुरु केली आणि या प्रकरणातील दोघांना ताब्यात घेतले आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.

आसिफ कुरेशीच्या पत्नीने सांगितला प्रसंग 
मृत आसिफ कुरेशीच्या पत्नीने घडलेल्या प्रकारावर भाष्य़ केलं. शेजारच्या एका मुलाने रात्री 9.30 -10 च्या सुमारास घराबाहेर त्याची स्कूटर पार्क केली होती. तेव्हा आसिफ त्याला म्हणाला, बेटा गाडी थोडी पुढे पार्क कर, पण त्या मुलाने शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि धमकी द्यायला लागला. तो मुलगा वरून खाली आला आणि त्याने आसिफच्या छातीवर धारदार वस्तूने वार केले. त्याचा भाऊही त्याच्यासोबत आला होता. आसिफच्या छातीतून खूप रक्तस्त्राव होऊ लागला. तेव्हा मी ताबडतोब माझा दीर जावेद याला घरी बोलावले, पण तोपर्यंत आसिफचा मृत्यू झाला होता, असे तिने सांगितले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;