Lok Sabha Election 2024 : पंजाबमध्ये अकाली दल-भाजपची युती नाहीच; भाजपच्या अडचणीत वाढ
पंजाबमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) एकट्याने लोकसभा निवडणूक लढवणार आहे. पक्षाचे प्रदेश प्रमुख सुनील जाखड यांनी मंगळवारी ही माहिती दिली. शिरोमणी अकाली दल (एसएडी) आणि भाजप यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा युती करण्याबाबत चर्चा सुरू असताना ही घोषणा करण्यात आली आहे.
सात टप्प्यातील निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात पंजाबमधील लोकसभेच्या 13 जागांसाठी 1 जून रोजी मतदान होणार आहे. जाखड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, ‘भाजप पंजाबमध्ये एकट्यानं निवडणूक लढवणार आहे’. पंजाबमधील जनता आणि कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या ‘फिडबॅक’नंतर भाजपने हा निर्णय घेतला आहे. BJP to contest the Lok Sabha elections alone in Punjab.
2019 मध्ये पंजाबमध्ये लोकसभेच्या 13 पैकी आठ जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. त्यानंतर एसएडी आणि भाजपने युती करून निवडणूक लढवली आणि प्रत्येकी दोन जागा जिंकल्या.
AAP ने पंजाबमधील 2022 च्या विधानसभा निवडणुकीत 117 पैकी 92 जागा जिंकून जबरदस्त मुसंडी मारली होती आणि आता लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर ‘आप’ची नजर आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List