कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीची बिघडली तब्येत, आयसीयूत केले दाखल
कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारी सोमवारी रात्री अचानत तब्येत बिघडली आणि तुरुंग प्रशासनात एकच गोंधळ उडाला. अन्सारी याच्या ओटीपोटात दुखत असल्याने त्याला तत्काळ राणी दुर्गावती मेडिकल कॉलेजच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकिय महाविद्यालयाबाहेर कडक सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली आहे.
मुख्तार अन्सारी सध्या जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सोमवारी मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास मुख्तार अन्सारीची अचानक तब्येत बिघडली आणि त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याबाबत त्याच्या नातेवाईकांना माहिती दिली. यावेळी मुख्तार अन्सारीचा भाऊ खासदार अफजाल अन्सारी त्याची तब्येत जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचणार आहेत. मुख्तारने त्याला जीवे मारण्याचा तसेच त्याच्या जेवणात स्लो पॉयझन दिले जात असल्याचा आरोप केला होता. मागच्या वेळेला मुख्तार अन्सारी याच्या सुरक्षेत केलेल्या हलगर्जीपणा तुरुंग अधिकाऱ्यासह तुरुंग उपाधिकाऱ्याचेही निलंबन करण्यात आले होते.
मुख्तार याला बांदा येथील मेडीकल कॉलेजच्या अतिदक्षता विभागात भरती करण्यात आले आहे. सध्या अतिदक्षता विभागात डॉक्टरांना देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची परिस्थिती गंभीर असून तुरुंग आणि जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी त्याच्या तब्येतीबाबत मौन राखणे पसंत केले आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List