कोणत्याही स्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही
रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर; पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
सांगलीवाडी येथे झालेल्या शक्तिपीठ महामार्गबाधित शेतकऱयांच्या मेळाव्यात शेट्टी बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील, माजी आमदार दिनकरतात्या पाटील, उदय नारकर, महेश खराडे, उमेश देशमुख, सतीश साखळकर उपस्थित होते.
कोणाचीही मागणी नसताना, शक्तिपीठ महामार्ग करण्याची गरजच काय? असा सवाल करून राजू शेट्टी म्हणाले, काँग्रेस सरकारच्या काळातच केंद्रात 2023 ला भूमी अधिग्रहण कायदा करण्यात आला. तो कायदा चांगला होता; पण त्यात केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारने बदल केला. त्यामुळे शेतकऱयांना फारच कमी भरपाई मिळणार आहे. त्यामुळे या महामार्गाला आमचा विरोध असून, कोणत्याही परिस्थितीत हा महामार्ग आम्ही होऊ देणार नाही. प्रसंगी रक्त सांडावे लागले तरी चालेल, असे शेट्टी यांनी सांगितले.
प्रतीक पाटील म्हणाले, या महामार्गाला आमचा विरोध आहे, आम्ही तो होऊ देणार नाही. माझी स्वतःचीही जमीन यात जात आहे म्हणून हा विरोध नाही, तर सर्व सामान्य शेतकऱयांच्या जमिनी जाऊन ते शेतीमुक्त होण्याची भीती आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List