Ahilyanagar News – आठवीच्या विद्यार्थ्यावर वर्गमित्रांनी केला चाकू हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू; गुन्हा दाखल

Ahilyanagar News – आठवीच्या विद्यार्थ्यावर वर्गमित्रांनी केला चाकू हल्ला, रुग्णालयात उपचार सुरू; गुन्हा दाखल

पाथर्डीमध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यावर त्याच्याच वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी चाकूने हल्ला केला आहे. शहरातील वीरसावरकर मैदानामध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेत वेदांत दत्ताञय कुलट हा विद्यार्थी जखमी झाला असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी त्याला अहिल्यानगर येथे हलवण्यात आले आहे. या संदर्भात सायंकाळी उशिरापर्यंत कोणताही गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल झालेला नव्हता. या घटनेने पालक वर्गातून चिंता व्यक्त होत आहे. वेदांत कुलट हा शहरातीलच एका विद्यालयात इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत आहे. आज दुपारी तो विद्यालयातून घरी आला व एका कामासाठी तो दुचाकीवरून वीर सावरकर मैदानावर गेला. या वेळी तेथे त्याच्याच वर्गातील दोन विद्यार्थी आले व त्यांच्याशी झालेल्या किरकोळ वादातून या दोन मित्रांनी कुलट याच्या पाठीवर चाकूने वार केले. या घटनेत कुलट हा जखमी झाला. त्याला जवळच असलेल्या काही नागरिकांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक विलास जाधव, पोलीस कॉन्स्टेबल निलेश गुंड व संजय जाधव यांनी भेट दिली असून या घटनेतील दोन विद्यार्थ्यांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;