अब्जाधीशांच्या यादीत मुंबईने बिजींगला टाकले मागे; ठरली आशियातील सर्वाधिक श्रीमंतांची राजधानी
हिंदुस्थानी शेअर बाजार नवेनवे उच्चांक गाठत असताना अर्थव्यवस्थेलाही गती येत आहे. त्याचबरोबर देशात अब्जाधीशांची संख्या वाढली असून अब्जाधीशांच्या संख्येत मुंबईने बिजींगला मागे टाकले आहे. तर जगात अब्जाधीशांच्या संख्येत मुंबई तिसऱ्या स्थानावर आली आहे. गेल्या पाच वर्षांत देशातील श्रीमंतांच्या संख्येत 75 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. देशात अब्जाधीशांची संख्या 1300 पेक्षा जास्त आहे. हुरून इंडियाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात याची माहिती देण्यात आली आहे.
हुरुन इंडिया रिच अहवालानुसार सध्या हिंदुस्थानात अब्जाधीशांच्या संख्या 1,319 झाली आहे. गेल्या पाच वर्षांत भारतात अशा लोकांची संख्या 75 टक्क्यांनी वाढली आहे. देशासह मुंबईतही अब्जाधिशांची संख्या वाढली आहे. चीनची राजधानी असलेल्या बिजींगलाही मुंबईने मागे पाडले आहे. आशिया खंडात मुंबई ही अब्जाधिशांची राजधानी बनली आहे.
आशिया खंडात अव्वल क्रमांक मिळावलेली मुंबई जागतिक स्तरावरही तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या क्रमांकावर न्युयॉर्क, दुसऱ्या क्रमांकावर लंडन आणि मग तिसऱ्या क्रमांकावर मुंबई आहे. चीनमध्ये 814 अब्जाधिश असून देशात 271 आहेत. मुंबईमध्ये 92 अब्जाधिश असून बीजिंगमध्ये 91 अब्जाधिश आहेत. त्यामुळे आता मुंबईने बिजींगला मागे टाकले आहे. मुंबईची एकूण अब्जाधिशांची संपत्ती 445 डॉलर अब्ज इतकी आहे. गेल्या वर्षांच्या तुलनेत ती 47 टक्क्यांनी वाढली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List