निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर भाजपला मिरच्या का झोंबतात? विजय वडेट्टीवार यांचा बोचरा सवाल

निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर भाजपला मिरच्या का झोंबतात? विजय वडेट्टीवार यांचा बोचरा सवाल

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यांसह निवडणूक आयोगाची पोलखोल केली. मतदार यादीतील अनियमितता आणि घोळ त्यांनी पुराव्यांसह मांडत मतचोरी कशी झाली ते स्पष्ट केले. राहुल गांधी यांनी ही पोलखोल केल्यानंतर खवळलेल्या भाजपवाल्यांनी त्यांच्यावर टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील राहुल गांधींवर टीका करताना असभ्य भाषा वापरल्य़ाचा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. यावर बोलताना काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप व निवडणूक आयोगावर जोरदार टीका केलीय

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतचोरीची पोलखोल केली तेव्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना इतका राग यायचा कारण काय होते की त्यांनी असभ्य भाषेचा वापर करत टीका केली? याचा एकच अर्थ जनतेला समजतो तो म्हणजे ही “मतचोरी” संगनमताने केली गेली का ? लोकशाही आणि संविधानाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न आयोग आणि भाजपने मिळून केला का ?राहुल गांधी हे निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमेतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे, निवडणूक आयोगाचा बचाव करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते इतके धावपळ का करत आहे ? निवडणूक आयोग स्वतःचा बचाव करू शकत नाही का? राहुल गांधीं विरोधात असभ्य भाषा वापरून मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिले की “कुंपणच शेत खात आहे”. राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले आहेत, त्याचं स्पष्टीकरण आयोगाने जनतेला दिलं पाहिजे. निवडणूक आयोगाला भाजपच्या क्लिनचीटची गरज इतकी भासते का ? हा राज्यासह देशातील जनतेला पडलेला प्रश्न आहे, असे वडेट्टीवार यांनी ट्विट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;