निवृत्ती घ्यायच्या वयात पठ्ठ्याने पुनरागमन केलं, 42 महिन्यांनी मैदानात उतरताच झाला भावुक

निवृत्ती घ्यायच्या वयात पठ्ठ्याने पुनरागमन केलं, 42 महिन्यांनी मैदानात उतरताच झाला भावुक

ज्या वयात खेळाडू निवृत्ती घेण्याचा विचार करतात, त्या वयात झिम्बाब्वेच्या एका खेळाडूने पुनरागमन केलं आहे. साडेतीन वर्षांचा प्रतिबंध त्याच्यावर लावण्यात आला होता. जवळपास 42 महिने मैदानापासून लांब राहिल्यानंतर अखेर 39 वर्षीय ब्रँडन टेलरने 7 ऑगस्ट रोजी न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन केलं आहे. या सामन्यात ब्रँडन टेलरने ब्रायन बॅनेटच्या सोबतीने सलामीला येत फलंदाजी केली. विशेष म्हणजे या सामन्यातील पहिल्या डावात ब्रँडन व्यतिरिक्त इतर कोणताच फलंदाज चमकदार कामगिरी करू शकलेला नाही.

जवळपासस साडेतीन वर्षांनी मैदानात उतरल्यामुळे ब्रँडन टेलर भावुका झालेला पाहायला मिळाला. त्याने आपल्या भावना सुद्धा यावेळी व्यक्त केल्या. तो म्हणाला की, “मी अनेक दिवस नरकासारखे घालवले, तो खूप कठीण काळ होता. 3 वर्षांपूर्वी मी अंथरूनातून उठू शकत नव्हतो, पण आज जे मला सर्वात जास्त आवडतं ते मी करत आहे, असं म्हणताना तो भावुक झाला. त्याचबरोबर त्याने झिम्बाब्वे क्रिकेट आणि कुटुंबातील सदस्यांचे आभार मानले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2022 साली ब्रँडन टेलरवर मॅच फिक्सिंगच्या आरोपाखाली साडे तीन वर्षांचा प्रतिबंध लावला होता. 2019 साली हिंदुस्थानच्या दौऱ्यावर येत असताना एका हिंदुस्थानी व्यवसायिकाने त्याला आंतरराष्ट्रीय सामन्यात फिक्सिंग करण्यासाठी 15 हजार युएस डॉलर दिले होते, जे ब्रँडन टेलरने स्विकारले होते. ब्रँडन टेलर हा झिम्बाब्वेकडून खेळताना सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज आहे.

बॅझबॉल म्हणजे बेजबाबदार क्रिकेट, इंग्लंडच्या आक्रमक फलंदाजीवर ग्रेग चॅपल यांचा संताप

न्यूझीलंड आणि झिम्बाब्वे यांच्यामध्ये दोन सामन्यांच्या कसोटा मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ब्रँडन टेलर सलामीला आला आणि त्याने 107 चेंडूंचा सामना करत 44 धावांची खेळी केली. मात्र त्याच्या व्यितिरिक्त इतर कोणताच मैदानावर फारकाळ टिकू शकला नाही. त्यामुळे पहिल्या डावात झिम्बाब्वेची अवस्था सध्या 112 धावांवर 9 विकेट अशी झाली आहे. या मालिकेत न्यूझीलंडने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;