Ratnagiri News – वृद्ध महिलेची हातपाय बांधून निर्घृण हत्या, अज्ञात आरोपींचा शोध सुरू

Ratnagiri News – वृद्ध महिलेची हातपाय बांधून निर्घृण हत्या, अज्ञात आरोपींचा शोध सुरू

चिपळूण शहरालगतच्या धामणवणे गावात गुरुवारी सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वृद्ध महिलेची हातपाय बांधून अज्ञात आरोपींनी निर्घृण हत्या केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. वर्षा मधुकर जोशी (68) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षां जोशी या आपल्या घरी एकट्याच वास्तव्यास होत्या. गुरुवारी सकाळी उशिरापर्यंत त्या उठलेल्या दिसल्या नाहीत. त्यामुळे शेजाऱ्यांना शंका आली. शेजाऱ्यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडून आत पाहिले असता त्यांना वर्षा मृतावस्थेत आढळून आल्या. तसेच त्यांचे हातापाय बांधले होते आणि शरीरावर जखमा होत्या.

चिपळूण पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच फॉरेन्सिक पथकांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

चोरीच्या उद्देशाने ही हत्या झाली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घरातून काही मौल्यवान वस्तू चोरी झाल्या आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत. या घटनेमुळे धामणवणे गाव आणि चिपळूण शहरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. जेष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून नागरिकांत चिंता व्यक्त केली जात आहे. पुढील तपास चिपळूण पोलीस करत असून, लवकरच आरोपींना गजाआड करू, असे आश्वासन पोलिसांनी दिले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;