अ‍ॅमेझॉनने सीईओसह 110 कर्मचाऱ्यांना काढले

अ‍ॅमेझॉनने सीईओसह 110 कर्मचाऱ्यांना काढले

जगभरातील प्रसिद्ध आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. आता अ‍ॅमेझॉनने आपल्या ऑडियो बिझनेच्या वंडरी पॉडकास्ट विभागातील 110 कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरून काढून टाकले आहे. कंपनीने कर्मचाऱ्यांसोबत वंडरीचे सीईओ यांनाही घरचा रस्ता दाखवला आहे. कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात अ‍ॅमेझॉनचे ऑडियो, ट्विच आणि गेम्सचे उपाध्यक्ष स्टिव्ह बूम यांनी सांगितले की, डॉ. डेथ अमेरिकन स्कँडल व बिझनेस वॉर्स यासारख्या नेरेटिव्ह आणि स्टोरी बेस्ड पॉडकास्ट सीरिजला आता अ‍ॅमेझॉनच्या ऑडियो बुक सर्व्हिस ऑडिबलअंतर्गत मॅनेज केले जाईल.

कंपनी आता क्रिएटरलेडेड, व्हिडीओ बेस्ड कंटेट वाढवत आहे. काही पॉडकास्टला बनवण्याची जबाबदारी वंडरी ब्रँडची असेल. अ‍ॅमेझॉनच्या म्हणण्यानुसार, हा बदल पॉडकास्ट कंजप्शनने प्रेरित आहे. व्हिडीओ स्टाईल, पर्सनाल्टिजचे शो यूट्यूब आणि स्पॉटिफायवर जास्त लोकप्रिय होत आहेत.

ओळख पुसणार नाही

110 कर्मचारी कपातीनंतर कंपनीकडून यासंबंधी स्पष्टीकरण आले आहे. ज्या कर्मचाऱ्यांना वंडरी पॉडकास्ट विभागातून काढून टाकले आहे, त्यातील काही कर्मचाऱ्यांना कंपनीच्या अन्य विभागांत काम दिले आहे. कंपनीने हे बदल केले असले तरी वंडरीच्या रूपात ब्रँडची ओळख पुसणार नाही. ती तशीच कायम राहणार आहे. तसेच वंडरी अ‍ॅपही सुरूच राहणार आहे, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;