धर्मेंद्र यांच्या फोटोमधील अभिनेत्री कोण? कायम असायची नशेत, वादग्रस्त प्रकरण

धर्मेंद्र यांच्या फोटोमधील अभिनेत्री कोण? कायम असायची नशेत, वादग्रस्त प्रकरण

सुपरस्टार धर्मेंद्र कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. धर्मेंद्र कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःच्या भावना चाहत्यांपर्यंत पोहोचवत असतात. एवढंच नाहीतर, रोजच्या गोष्टी देखील धर्मेंद्र सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. पण आता धर्मेंद्र यांनी जुना फोटो पोस्ट केला आहे. धर्मेंद्र यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्री तनुजा दिसत आहेत. ज्यामध्ये तनुजा नशा करताना दिसत आहेत. फोटोमध्ये त्यांच्यासोबत राज खोसला दिसत आहेत. एका फ्रेममध्ये तीन सेलिब्रिटींना एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.

धर्मेंद्र यांनी फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘तनुजा आणि दिवंगत राज खोसला यांच्यासोबत...’ असं लिहिलं आहे. सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल होत आहे. फोटो व्हायरल झाल्यानंतर जुना किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. रिपोर्टनुसार, तनुजा यांना सिगारेट प्यायला प्रचंड आवडायचं. एक काळ असा होता जेव्हा त्यांची ओळख चैन स्मोकर म्हणून होती. एका दिवसाला तनुजा 1 – 2 पॅक स्मोकिंग करायच्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तनुजा सर्वांसमोर स्मोकिंग करायच्या म्हणून वादाच्या भोवऱ्यात राहायच्या..

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam)

 

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्याने मीडिया आणि बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी अनेकदा नाराजी व्यक्त केली. सतत नशेत असल्यामुळे तनुजा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकल्या. पण त्यांच्या एका सवयीचा परिणाम कधीच चाहत्यांवर झाला नाही. चाहत्यांनी तनुजा यांच्यावर भरभरुन प्रेम केलं.

तनुजा यांच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, धर्मेंद्र आणि तनुजा यांनी को इज्जत, पाप को जला कर राख कर दूंगा, बहारें फिर भी आएंगी, दो चोर, मर्द की जुबान, मोहब्बत की कसम आणि चांद और सूरज यांसारख्या सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. दोघांनी एकेकाळी बॉलिवूड आणि चाहत्यांच्या मनावर राज्य केलं…

सांगायचं झालं तर, धर्मेंद्र यांनी फोटो पोस्ट केल्यामुळे जुन्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त धर्मेंद्र यांच्या पोस्टची चर्चा रंगली आहे. आज धर्मेंद्र पूर्वीप्रमाणे बॉलिवूडमध्ये सक्रिय नसले तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;