निवडीनंतर पाच महिने उलटले तरी आरोग्य सेवकांना मिळेना नियुक्ती; झेडपीत अनागोंदी कारभार कार्यवाहीसाठी सादर

निवडीनंतर पाच महिने उलटले तरी आरोग्य सेवकांना मिळेना नियुक्ती; झेडपीत अनागोंदी कारभार कार्यवाहीसाठी सादर

पुणे जिल्हा परिषदेच्या कारभारातील अनागोंदी पुन्हा एकदा उघड झाली आहे. पाच महिने उलटूनही आरोग्य सेवक (50 टक्के पुरुष प्रवर्ग) या 128 पदांपैकी 125 पात्र उमेदवारांना अद्याप नियुक्तीपत्र मिळालेले नाही. परिणामी, झेडपीत उमेदवारांच्या भविष्यावर गंडांतर आले आहे.

2023 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करून 2024 मध्ये परीक्षा व 2025 च्या मार्चमध्ये कागदपत्र पडताळणी पूर्ण झाली. तरीही नियुक्तीच्या प्रक्रियेला चालढकल होत असून, इतर संवर्गातील उमेदवारांना नियुक्त्या दिल्या गेलेल्या असताना केवळ या संवर्गाची फाइल ढेपाळलेली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चार उमेदवारांच्या कागदपत्रांतील गोंधळामुळे संपूर्ण प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. यातील तीन उमेदवार अपात्र ठरले असून, उर्वरित 125 जणांची यादी पुढील झाल्याचे समजते. मात्र, त्यानंतरही जिल्हा परिषद यंत्रणा गप्प आहे.

राज्यातील इतर जिल्हा परिषदांनी याच संवर्गातील उमेदवारांना वेळेवर नियुक्त करून सेवेत सामील करून घेतले आहे. त्यांना नियमित वेतनही सुरू आहे. मग पुण्यातच ही प्रक्रिया रखडते कशी, असा संतप्त सवाल उमेदवारांकडून विचारला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;