महायुतीतील पक्षांमध्ये शून्य समन्वय, ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकपदी माणसे नेमण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस-मिंधेंमध्ये चढाओढ – अंबादास दानवे
महायुतीतील पक्षांमध्ये समन्वय शून्य आहे. बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी माणसे नेमण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दिल्ली वाऱ्या करणारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागांची ही चढाओढ सुरु आहे. तीन लोक एकमेकांत समन्वय साधू शकत नसतील तर 11 कोटी जनतेचे कोणते कल्याण हे करतील? असं शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे म्हणाले आहेत. X वर एक पोस्ट करत ते असं म्हणाले आहेत.
दरम्यान, बेस्ट महाव्यवस्थापक पदासाठी अतिरिक्त कार्यभार मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) दोन अतिरिक्त अधिकाऱ्यांकडे देण्यात आल्याने गोंधळ वाढल्याचं पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बेस्टचा अतिरिक्त कार्यभार अश्विनी जोशी यांच्याकडे सुपूर्द केला. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याकडून आशिष शर्मा यांची त्याच पदावर नेमणूक केली. एकाच पदासाठी एकाच दिवशी दोन आदेश आणि दोघांकडे अतिरिक्त कार्यभाराचा आदेश देण्यात आल्याने या दोन्ही नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
महायुतीतील पक्षांमध्ये समन्वय शून्य आहे याचे हे साधे उदाहरण. ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकपदी माणसे नेमण्याची मुख्यमंत्री आणि दिल्ली वाऱ्या करणारे उपमुख्यमंत्री यांच्या विभागांची ही चढाओढ. तीन लोक एकमेकांत समन्वय साधू शकत नसतील तर ११ कोटी जनतेचे कोणते कल्याण हे करतील? @Dev_Fadnavis… pic.twitter.com/S7yhmK58jj
— Ambadas Danve (@iambadasdanve) August 6, 2025
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List