Photo – उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची घेतली भेट
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी सौ. रश्मी उद्धव ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे, नेते व खासदार खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, खासदार फौझिया खान, खासदार अमोल कोल्हे, खासदार संजय दिना पाटील, खासदार निलेश लंके, खासदार भास्कर भगरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, खासदार बजरंग सोनवणे, आमदार मिलिंद नार्वेकर व सलील देशमुख हे देखील उपस्थित होते.

About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List