मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था, समन्वय बैठकीतील आश्वासनांवर प्राधिकरण अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ

मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था, समन्वय बैठकीतील आश्वासनांवर प्राधिकरण अधिकाऱ्यांनी फिरवली पाठ

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील आरवली ते बावननदी या दरम्यान सुरू असलेल्या ढिसाळ कामकाजामुळे त्रस्त झालेल्या जनतेने यापूर्वी 26 जुलै रोजी आंदोलनाचा इशारा दिला होता. कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून संगमेश्वर पोलीस ठाण्यात समन्वय बैठक बोलावण्यात आली होती. यावर पुढील कार्यवाही अद्याप न झाल्याने उपोषण करण्यावर आंदोलनकर्ते ठाम आहेत.

बैठकीदरम्यान आंदोलनकर्त्यांनी प्राधिकरण अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. अपघातांमुळे झालेल्या जखमा, काहींचा गेलेला जीव, आणि दैनंदिन जीवघेणा प्रवास याबाबत लोकांनी संताप व्यक्त केला. मात्र, ठेकेदार कंपनीचा एकही जबाबदार अधिकारी हजर न राहिल्याने उपस्थितांचा संताप वाढला. उलट, प्राधिकरण अधिकारी ठेकेदारांची बाजू घेत असल्याने त्यांनी ठेकेदाराची पाठराखण करण्याचा ठेकाच घेतला आहे का? असा संशय लोकांमध्ये निर्माण झाला.

1 ऑगस्ट रोजी आंदोलनकर्त्यांचे शिष्टमंडळ आणि प्राधिकरण अधिकारी यांच्यासोबत महामार्गाची पाहणी करण्याचे ठरले होते; मात्र वेळकाढूपणा करत तो दौरा वारंवार पुढे ढकलण्यात आला. अखेरीस 4 ऑगस्टला काहींना घेऊन पाहणी झाली, पण त्यावेळीही ठेकेदार कंपनीचा एकही जबाबदार अधिकारी हजर राहिला नाही.

या सर्व घडामोडींमुळे जनतेचा संताप शिगेला पोहोचला. आंदोलकांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, हा निव्वळ वेळकाढूपणा असून जनतेच्या जीवाशी खेळ केला जात आहे. त्यामुळे आता माघार घेणार नाही, आंदोलन आणि उपोषण करूनच न्याय मिळवू असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला. त्यानुसार 11 ऑगस्ट रोजी सोनवी पुलाशेजारी राहुल गुरव उपोषणास बसणार असून, संगमेश्वर तालुक्यातील जनता महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनीविरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे. याबाबत निवेदन प्रशासन विभागाला सादर करण्यात आले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;