IND Vs ENG Test Series – हा फक्त एक योगायोग… जसप्रीत बुमराला ट्रोल करणाऱ्यांना सचिन तेंडुलकरच तोडीस तोड उत्तर

IND Vs ENG Test Series – हा फक्त एक योगायोग… जसप्रीत बुमराला ट्रोल करणाऱ्यांना सचिन तेंडुलकरच तोडीस तोड उत्तर

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये नुकतीच अ‍ॅण्डरसन-तेंडुलकर मालिका पार पाडली. ही पाच सामन्यांची मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. मॅंचेस्टर कसोटीमध्ये दोन्ही संघांनी विजयश्री खेचून आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. अखेर मोहम्मद सिराजने आपला जलवा दाखवला आणि सामना खेचून आणला. त्यामुळे मालिका अनिर्णिती सुटली. टीम इंडियाने दोन सामने या मालिकेत जिंकले आणि या दोन्ही सामन्यांमध्ये जसप्रीत बुमरा नव्हता. त्यामुळे जसप्रीत बुमराला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराच्या बाजूने आता सचिन तेंडुलकर मैदानात उतरला असून त्याने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.

टीम इंडियाने जिंकलेल्या दोन्ही सामन्यांमध्ये जसप्रीत बुमरा खेळला नव्हता. यावरून त्याला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. जसप्रीत बुमराची बाजू आता खुद्द सचिन तेंडुलकरने घेतली आहे. Reddit वर बोलत असताना तो म्हणाला की, “ज्या सामन्यांमध्ये जसप्रीत बुमरा खेळला नाही, ते सामने टीम इंडियाने जिंकणं हा फक्त एक योगायोग आहे. मला माहितीये की लोकं वेगवेगळ्या गोष्टी बोलत आहेत. खर सांगायचं झालं तर माझ्यासाठी हा फक्त एक योगायोग आहे बाकी काही नाही. जसप्रीतने मालिकेची चांगली सुरुवात केली. पहिल्या सामन्यात पाच विकेट घेतल्या. दुसऱ्या सामन्यात तो खेळला नाही, परंतु तिसऱ्या सामन्यात खेळताना त्याने चांगली गोलंदाजी केली. चौथ्या सामन्यात त्याने पुन्हा एकदा पाच विकेट घेतल्या. त्यामुळे सध्याच्या घडीला जगात त्याच्यासारखा कोणताच गोलंदाजी नाही.” असं म्हणत सचिनने जसप्रीतची बाजू घेतली असून ट्रोल करणाऱ्यांना तोडीस तोड उत्तर दिलं आहे.

मैदानात कोल्हा आला आणि सामना थांबला, थेट क्रिकेटच्या पंढरीला घातली प्रदक्षिणा! पाहा Video

“जसप्रीत बुमराच प्रदर्शन जबरदस्त राहिलं आहे. आतापर्यंत त्याने जो काही खेळ केला आहे, तो अविश्वसनीय आहे. माझ्या मते, तो नि:संशयपणे या काळातील सर्वात सातत्यपूर्ण खेळ खेळणारा खेळाडू आहे. मी त्याला इतर कोणत्याही खेळाडूपेक्षा चांगला खेळाडू मानतो.” असं सचिन तेंडुलकर म्हणाला आहे. जसप्रीत बुमराने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तीन सामने खेळले आणि तीन सामन्यांमध्ये 14 विकेट घेतल्या आहेत. तसेच एकाच डावात पाच विकेट घेण्याचा पराक्रम सुद्धा त्याने केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;