मारहाणप्रकरणी मिंधे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल

मारहाणप्रकरणी मिंधे गटाच्या जिल्हाप्रमुखावर गुन्हा दाखल

सोलापूर शहरातील सातरस्ता परिसरात असलेल्या स्टार हॉटेलच्या चालकाला मारहाण करून मोबाईल हिसकावून नेल्याप्रकरणी मिंधे गटाचा जिल्हाप्रमुख मनीष काळजेविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काळजेविरुद्ध नुकताच फसवणुकीचाही गुन्हा दाखल असताना हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने तो पोलिसांच्या रडारवर आला आहे.

सातरस्ता परिसरात वसीम ए. गफार पेराइमाम हा स्टार हॉटेल चालवितो. या हॉटेलमागे मिंधे गटाचा जिल्हाप्रमुख मनीष काळजे याने आपले कार्यालय थाटले आहे. या हॉटेलच्या बाजूला कार्यालयात जाण्यासाठी गेट आहे. रात्रीच्या सुमारास मनीष काळजेच्या गेटसमोर वाहन लावलेले होते. वाहन पाहून काळजे हॉटेलमध्ये घुसला व त्याने हॉटेलचालकाला शिवीगाळ करीत मारहाण केली. यावेळी त्याने हॉटेल पेटवून देण्याची धमकी दिली. यावेळी काळजेच्या चालकानेही मारहाण केली. यावेळी हॉटेलमधील एक कामगार घटनेचे मोबाईलमधून चित्रीकरण करत असल्याचे काळजे याने पाहिले. त्याने 22 हजार रुपये किमतीचा तो मोबाईलही हिसकावून नेला. याप्रकरणी सदर बझार पोलीस ठाण्यात मनीष काळजेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;