मस्तच! व्हिएतनाममधून स्वस्तात आणला मॅकबुक, 11 दिवसांचा टूर फ्री मिळाला

मस्तच! व्हिएतनाममधून स्वस्तात आणला मॅकबुक, 11 दिवसांचा टूर फ्री मिळाला

हिंदुस्थानात महाग मिळणारे अ‍ॅपलचे मॅकबुक प्रो लॅपटॉप व्हिएतनाममधून स्वस्तात खरेदी केले जाऊ शकते. एवढेच नव्हे तर वाचलेल्या पैशांतून स्वस्तात मस्त अशी आंतरराष्ट्रीय सहलही होऊ शकते. एका रेडिट युजरने याबाबतचा स्वतःचा अनुभव शेअर केला आहे.

संबंधित व्यक्तीने व्हिएतनामची राजधानी हनाईची टूर केली. हिंदुस्थानच्या मार्केटमध्ये अ‍ॅपल प्रोडक्टवर लागणारे आयात शुल्क, जीएसटी आणि प्रिमियमच्या किमतीतून बचत व्हावी म्हणून या व्यक्तीने हनोईला जायचे ठरवले. त्याने सर्वात किफायतशीर राऊंड ट्रीप फ्लाईट बुक केली. तिथे पोचल्यावर मॅकबुक प्रो लॅपटॉपसाठी त्याने मॅकबुक डीलच्या 15हून अधिक स्टोरला भेट दिली. जास्तीत जास्त बचत करण्यासाठी व्हॅट (मूल्यवर्धित कर) कागदपत्रांची काळजीपूर्वक चौकशी करण्याचा सल्ला त्याने नेटीजन्सला दिला आहे. या धोरणात्मक दृष्टिकोनाचा त्याला चांगला फायदा झाला. हिंदुस्थानात समान्यतः 1.85 लाख रुपयांना मिळणारा मॅकबुक प्रो त्याला व्हिएतनामध्ये व्हॅट परतावा मिळाल्यानंतर फक्त 1.48 लाख रुपयांना पडला. म्हणजे 36 हजार 500 रुपयांची बचत झाली.

पोस्टची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

या हिंदुस्थानी व्यक्तीला 11 दिवसांचा पूर्ण टुरचा (ज्यामध्ये राहण्याचा खर्च, मॅकबुकची खरेदी (रिफंडनंतरची रक्कम) आणि विमानाचा खर्च समाविष्ट आहे ) मिळून 1 लाख 97 हजार रुपये खर्च झाला. यातून मॅकबुकची किंमत 1.48 लाख वजा केली तर सहलीचा खर्च फक्त 48 हजार रुपये झाला. रेडिट युजरचा हा अनुभव चांगलाच व्हायरल होत आहे. महागड्या वस्तू खरेदी करण्यासाठी अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय सहली उपयुक्त ठरत आहेत, या पोस्टवर सोशल मीडियातून नेटकरी जोरदार चर्चा करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;