कबुतरांसाठी सरकारची फडफड, जैन समाजाच्या दबावापुढे फडणवीस झुकले; यंत्राद्वारे स्वच्छता आणि बंदिस्त पक्षीगृह… पालिका दाणे घालणार

कबुतरांसाठी सरकारची फडफड, जैन समाजाच्या दबावापुढे फडणवीस झुकले; यंत्राद्वारे स्वच्छता आणि बंदिस्त पक्षीगृह… पालिका दाणे घालणार

कबुतरांसाठी सरकारची फडफड आज पाहायला मिळाली. जैन समाजाच्या दबावापुढे झुकत तातडीने बैठक घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबुतरांच्या प्रश्नावर महत्त्वाचे निर्देश पालिकेला दिले. पर्यायी व्यवस्था पूर्ण होईपर्यंत कबुतरांना बंदिस्त जागेत नियंत्रित खाद्यपुरवठा (कंट्रोल फीडिंग) सुरू ठेवावा. कबुतरखान्यांची स्वच्छता यांत्रिक पद्धतीने करावी, असे नमूद करतानाच पक्षीगृह उभारण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. राज्य शासन कबुतरांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयात भूमिका मांडेल. तसेच गरज भासल्यास सर्वोच्च न्यायालयातही जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कबुतरांची विष्ठा आणि पिसांमुळे श्वसनाचे आणि फुप्फुसांचे आजार वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कबुतरखान्यांवर कारवाईचे पाऊल उचलण्यात आले. महापालिकेने दादरचा कबुतरखाना पाडण्यासाठी कारवाई सुरू केली होती. त्या कारवाईला जैन समाजाने तीव्र विरोध केल्याने महापालिकेने ताडपत्री टाकून कबुतरखाना बंद केला. जैन समाजाने त्याविरोधात रविवारी शांतिदूत यात्रा काढून पालिकेचा निषेध केला.

कबुतरखान्याचा वाद चिघळल्याने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात या प्रश्नासंदर्भात बैठक झाली. कबुतरांचे जीव वाचविणे, पर्यावरणाचे रक्षण करणे आणि नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे या तिन्ही बाबी महत्त्वाच्या आहेत. कबुतरखाना अचानक बंद करणे योग्य नाही, कबुतरखान्याबाबत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करताना पर्यायी उपाययोजना करण्यात याव्यात, असे निर्देश यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले. यासंदर्भात माजी पेंद्रीय मंत्री मनेका गांधी यांच्याशी चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले.

गरज भासल्यास सुप्रीम कोर्टात जाणार

कबुतरखान्याशी संबंधित मुद्दय़ांवर सध्या उच्च न्यायालयात रिट याचिकेवर सुनावणी सुरू आहे. या विषयावर न्यायालयात राज्य शासन आणि मुंबई महानगरपालिकेने आपली भूमिका मांडावी. गरज भासल्यास राज्य शासन सर्वोच्च न्यायालयातही आपली भूमिका मांडेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री गणेश नाईक, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, काwशल्य विकास व रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा, महापालिका आयुक्त भूषण गगराणी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

  • कबुतरांच्या आरोग्यपूर्ण देखभालीसाठी आणि नागरी आरोग्यावर विपरीत परिणाम होणार नाही यासाठी कोणत्या वेळेत खाद्यपुरवठा व्हावा आणि कोणत्या वेळेत नाही याबाबत नियमावली तयार करा.
  • कबुतरखान्यांच्या आरोग्यविषयक दुष्परिणामांचा वैज्ञानिक पद्धतीने तज्ञांच्या मदतीने अभ्यास अहवाल तयार करावा.
  • कबुतरांची विष्ठा साफ करण्यासाठी तांत्रिक उपायांचा विचार करावा.
  • मुंबई महापालिकेने कबुतरांसाठी पक्षीगृह उभारावे आणि त्याची देखभाल करावी.

मीरा रोडमध्ये दाणे टाकण्यावरून वृद्धावर हल्ला मुलीचा गळा दाबून रॉडने मारहाण

मीरा रोडमध्ये कबुतरांना उघडय़ावर दाणे टाकणाऱ्या एका महिलेने तिला रोखणाऱया वृद्धावर आणि त्याच्या मुलीवर जीवघेणा हल्ला केला. या वृद्धाला बेदम मारहाण सुरू असताना त्यांची मुलगी मधे पडली म्हणून तिच्यावर लोखंडी रॉडचे घाव घालत गळाही दाबला. महेंद्र पटेल आणि प्रेमल पटेल असे जखमी पितापुत्रीचे नाव असून हल्लेखोर आशा व्यास आणि तिच्या तीन साथीदारांवर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाकूर मॉलजवळील डीबी ओझोन इमारतीत राहणाऱया आशा व्यास या कबुतरांना उघडय़ावर दाणे घालत होत्या. त्यावेळी शेजारच्या इमारतीत राहणारे महेंद्र पटेल हे दूध आणण्यासाठी खाली आले. आशा व्यास यांना त्यांनी कबुतरांना उघडय़ावर दाणे घालू नका असे सांगितले. त्यामुळे आशा व्यास यांच्या रागाचा पारा चढला आणि त्यांनी पटेल यांना शिवीगाळ करत वाद घातला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;