46 वर्षे लढा! हरा जिंकल्या; नव्वदीनंतर पेन्शन!
‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशी अवस्था आहे. परंतु पतीच्या निधनानंतर एका महिलेला पेन्शनसाठी तब्बल 46 वर्षे थांबावे लागले. सतत कार्यालयात चकरा माराव्या लागल्या. 46 वर्षांनंतर ओडिशा उच्च न्यायालयाने या महिलेला दिलासा देत संबंधित अधिकाऱयांना पेन्शन देण्याच्या सूचना दिल्या आहेत, परंतु महिलेचे वय आता 91 वर्षे झाले आहे. या महिलेला पुढील महिन्यापासून पेन्शन मिळणे सुरू होणार आहे. न्यायमूर्ती बिरजा प्रसन्ना सतपिती यांच्या न्यायाधीश खंडपीठाने हा निकाल दिला.
उच्च न्यायालयाने केंद्रपाडाचे जिल्हाधिकारी सूर्यवंशी मयूर विकास यांना 91 वर्षीय महिलेला कुटुंबाचे पेन्शन देण्याची व्यवस्था करण्यासाठी एका महिन्याची वेळ दिली. महिलेचे पती एक शिक्षक होते. त्यांचे 46 वर्षांआधी निधन झाले होते. याप्रकरणी चार महिन्यांआधी उच्च न्यायालयाकडून पेंद्रपाडा जिल्हा कलेक्टर यांना आदेश जारी करण्यात आले होते. 15 नोव्हेंबर 2023 ला मंजूर करण्यात आले होते की, हरा साहू यांना काwटुंबिक पेन्शन द्यायला हवी. हायकोर्टाच्या आदेशानंतर एक महिन्यानंतर याचे पालन करण्यात आले नाही.
– हरा साहू यांच्या पतीचे निधन 26 ऑगस्ट 1977 मध्ये झाले होते. त्या पेंद्रपाडा जिह्याच्या पालेई डेरापुंडीमध्ये आपला मुलगा, सून, तीन नातवंडे आणि दोन नात यांच्यासोबत राहतात.
– 19 ऑक्टोबर 2023 ला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कोर्टाने पेंद्रपाडा जिल्हाधिकारी यांचा आदेश रद्द केला. पतीचे निधन झाले नसते तर ते 1983 मध्ये सेवानिवृत्त झाले असते. असे कोर्टाने नमुद केले.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List