छोट्या पडद्यावर मोठं वादळ उठणार; ‘बिग बॉस’मध्ये समलैंगिक जोडप्याची एन्ट्री, कोण आहेत ‘त्या’ दोघी?

छोट्या पडद्यावर मोठं वादळ उठणार; ‘बिग बॉस’मध्ये समलैंगिक जोडप्याची एन्ट्री, कोण आहेत ‘त्या’ दोघी?

‘बिग बॉस’ हा शो आणि वाद याचे जुने नाते आहे. मग सलमान खान होस्ट करतो तो हिंदीतील ‘बिग बॉस’ शो असो किंवा अन्य दुसऱ्या भाषेतील, प्रत्येक वेळी या शोमध्ये काही ना काही तरी वादग्रस्त घडते आणि मग त्याची बातमी होते. यामुळेच ‘बिग बॉस’ हा शो प्रचंड प्रसिद्धही आहे. आता मल्याळम स्टार मोहनलाल यांचा ‘बिग बॉस मल्याळम’चा सातवा सिझन येत असून यात एका समलैंगिक जोडप्याला एन्ट्री देण्यात आली आहे. त्यामुळे छोट्या पडद्यावर मोठे वादळ उठणार हे निश्चित.

मोहनलाल यांच्या शोमध्ये सिनेसृष्टीतील कलाकारांसह सामान्य लोकही दिसणार आहेत. यात मल्याळम कलाकार अनुमोल, आरजे बिंसी, रेणु सुधी आणि गिजेल ठकराल सारख्या बड्या नावांचाही समावेश आहे. यात अदिला आणि फातिमा नावाचे समलैंगिक जोडपेही दिसणार आहे. या दोघींनी सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे. सगळीकडे सध्या त्यांचीच चर्चा सुरू आहे.

कोण आहेत अदिला आणि फातिमा?

अदिला नसरीन आणि फातिमा नुरा केरळमधील समलैंगिक जोडपे आहे. एकमेकींच्या प्रेमासाठी दोघींही अख्ख्या जगाशी लढाई केली होती. दोघींनी सोबत राहण्यासाठी कोर्टाचा दरवाजाही ठोठावला होता. यात त्यांना यश आले आणि दोघींची लव्हस्टोरी तुफान गाजली.

अदिला आणि फातिमा यांची पहिली भेट सौदी अरबमध्ये झाली होती. त्यावेळी दोघीही 12 वीच्या वर्गात शिकत होत्या. दोघींमध्ये खास मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या प्रेमाबाबत कुटुंबियांनी सांगितले. कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली. दोघींच्या कुटुंबियांनी त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला. पण दोघींनीही माघार घेतली नाही आणि दोघींनी घर सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोघींनी केरळच्या कोझीकोड येथे बस्तान बसवले. मात्र अदिलाचे कुटुंबीय तिथे आले आणि तिला घेऊन गेले. याच दरम्यान फातिमाच्या कुटुंबाने अदिलाविरोधात पोलीस तक्रार केली.

अखेर अदिलाने फातिमासोबत आपले प्रेमसंबंध असल्याचे जाहीर करत हे प्रकरण कोर्टात खेचले. केरळ हायकोर्टात याचिका दाखल करत फातिमाच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले. यानंतर हायकोर्टाने अदिला आणि फातिमाच्या बाजुने निकाल देत ऐतिहासिक निर्णय दिला. यावेळी एलजीबीटीक्यू+ समुदायही त्यांच्या पाठीशी होता. कोर्टाने दोघींना एकमेकींसोबत राहण्याची परवानगी दिली.

अर्थात कोर्टाच्या निर्णयानंतरही त्यांच्या अडचणी कमी झाल्या नाहीत. कुटुंबीय तर तुटलेच शिवाय समाजानेही त्यांना सहजासहजी स्वीकारले नाही. मात्र याचा दोघींना काहीही फरक पडला नाही. आजही दोघी सोशल मीडियावर सक्रीय असून त्यांचे एक युट्यूब चॅनेलही आहे. तिथे त्यांचे लाखो सबस्क्राईबर आहेत. आता दोघीही रियालिटी शोमध्ये दिसणार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;